आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interview Of Marathi Star Anuja Sathe Gokhale On Remembering 2014

आठवणीतील 2014 : \'बाजीराव मस्तानी\'द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पणाची मिळाली संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रः अभिनेत्री अनुजा साठे-गोखले)

2014 हे वर्ष आता सरत आले आहे. या वर्षभरात अनेकांच्या जीवनात काही सुखद, तर काही दुःखद घटना घडल्या. कोणत्या तरी घटनेमुळे 2014 हे वर्ष प्रत्येकाच्या कायम लक्षात राहणारे ठरले. सरत्या वर्षाला निरोप देताना आम्ही काही सेलिब्रिटींकडून 2014 हे वर्ष त्यांच्यासाठी कोणत्या घटनेमुळे लक्षात राहिले, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय.

हेही वाचाः आठवणीतील 2014 : ''सरते वर्ष ठरले माझ्यासाठी पुढचं पाऊल टाकणारे''

याच सदरात आज अभिनेत्री अनुजा साठे-गोखले हे वर्ष कोणत्या घटनेमुळे तिच्या लक्षात राहिले, ते सांगत आहे.
"करिअरच्या दृष्टीने हे वर्ष माझ्यासाठी खूप महत्त्वाचे ठरले. यावर्षी मला बॉलिवूडमध्ये पदार्पणाची संधी मिळाली आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आणि रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा स्टारर 'बाजीराव मस्तानी' या सिनेमात मला काम करण्याची संधी मिळाली आहे. या सिनेमात बाजीरावांची बहीण भिऊबाईची भूमिका मी साकारत आहे. या सिनेमातील माझी निवड रितसर ऑडीशन देऊन झाली. सिनेमातील माझे काही सीन्स शूट झाले आहेत. हिंदीतील पदार्पणामुळे मी आनंदित आहे. या सिनेमामुळे हिंदीत काम करण्याचा अनुभव मिळाला आहे. मराठीतही माझे काम सुरु आहे. हिंदी आणि मराठीत काम करण्याच्या अनुभवाविषयी सांगायचे झाल्यास, मराठीत काम करणे घरी काम केल्यासारखे आहे. याचवर्षी माझी महत्त्वपूर्ण भूमिका असलेली 'लगोरी' ही मालिका छोट्या पडद्यावर दाखल झाली. या मालिकेच्या निमित्ताने मला खूप चांगल्या मैत्रिणी मिळाल्या. मालिकेतील भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असल्याची पोचपावती मला वेगवेळ्या माध्यमातून मिळत आहे. मैत्रीवर आधारित या मालिकेशी संबंधित एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे, पाच जुन्या मैत्रिणी फेसबुकच्या माध्यमातून पुन्हा भेटल्या आणि त्या सर्वजणी आम्हाला भेटायला मालिकेच्या सेटवर आल्या होत्या. हा माझ्यासाठी खूप सुखद अनुभव ठरला."
पुढील स्लाईड्समध्ये पाहा फेसबुक अकाउंटवरुन घेण्यात आलेली अनुजाची खास छायाचित्रे...
(शब्दांकन - वैशाली करोले)