आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interview Of Marathi Star Lalit Prabhakar On Remembering 2014

आठवणीतील 2014: \'जुळून येती रेशीमगाठी\'मुळे घराघरांत पोहोचलो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रः अभिनेता ललित प्रभाकर)

2014 हे वर्ष आता सरत आले आहे. या वर्षभरात अनेकांच्या जीवनात काही सुखद, तर काही दुःखद घटना घडल्या. कोणत्या तरी घटनेमुळे 2014 हे वर्ष प्रत्येकाच्या कायम लक्षात राहणारे ठरले. सरत्या वर्षाला निरोप देताना आम्ही काही सेलिब्रिटींकडून 2014 हे वर्ष त्यांच्यासाठी कोणत्या घटनेमुळे लक्षात राहिले, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय.
याच सदरात आज अभिनेता ललित प्रभाकर हे वर्ष कोणत्या घटनेमुळे त्याच्या लक्षात राहिले, ते सांगत आहे.
"हे वर्ष माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. यावर्षी माझी प्रमुख भूमिका असलेली 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका छोट्या पडद्यावर दाखल झाली. या मालिकेत मी साकारत असलेली आदित्यची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ही मालिका मला मिळाली होती. या मालिकेमुळे मी घराघरांत पोहचलो याचा आनंद आहे. मालिकेच्या माध्यमातून आदित्य म्हणूनच नव्हे तर ललित म्हणून लोक मला ओळखू लागले. मुलाखतींच्या माध्यमातून ललित म्हणून माझे विचार काय आहेत, ते माझ्या चाहत्यांना कळले. या मालिकेसाठी मला झी मराठीचा यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारसुद्धा मिळाला. प्रेक्षकांनी मला भरभरुन प्रेम दिले आहे. त्यांचे हे प्रेम भविष्यातसुद्धा असेच मिळत राहिल, अशी आशा मी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना आगामी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा."
पुढील स्लाईड्समध्ये पाहा तुमच्या लाडक्या आदित्यची अर्थातच अभिनेता ललित प्रभाकरची सोशल अकाउंटवरुन घेतलेली खास छायाचित्रे...
(शब्दांकनः वैशाली करोले)

हेही वाचाः आठवणीतील 2014 : ''प्रियानंतर आता प्रेक्षकांनी प्रगती राजवाडेला स्वीकारले याचा आनंद''

हेही वाचाः आठवणीतील 2014 : 'बाजीराव मस्तानी'द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पणाची मिळाली संधी

हेही वाचाः आठवणीतील 2014 : ''सरते वर्ष ठरले माझ्यासाठी पुढचं पाऊल टाकणारे''