Home | Bollywood | Marathi Cinekatta | Interview Of Marathi Actess Prarthana Behere On Remembering 2014

आठवणीतील 2014: ''टीकाकारांना चोख उत्तर देत आपले काम प्रामाणिकपणे केले''

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Dec 23, 2014, 08:46 AM IST

आज 'पवित्र रिश्ता' ही हिंदी मालिका, 'जय महाराष्ट्र ढाबा बटिंडा' या मराठी सिनेमातून आपल्या भेटीला आलेली अभिनेत्री प्रार्थना बेहरे हे वर्ष कोणत्या घटनेमुळे तिच्या लक्षात राहिले, ते सांगत आहे.

 • Interview Of Marathi Actess Prarthana Behere On Remembering 2014
  (अभिनेत्री प्रार्थना बेहरे)

  2014 हे वर्ष आता सरत आले आहे. या वर्षभरात अनेकांच्या जीवनात काही सुखद, तर काही दुःखद घटना घडल्या. कोणत्या तरी घटनेमुळे 2014 हे वर्ष प्रत्येकाच्या कायम लक्षात राहणारे ठरले. सरत्या वर्षाला निरोप देताना आम्ही काही सेलिब्रिटींकडून 2014 हे वर्ष त्यांच्यासाठी कोणत्या घटनेमुळे लक्षात राहिले, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय.

  याच सदरात आज 'पवित्र रिश्ता' ही हिंदी मालिका, 'जय महाराष्ट्र ढाबा बटिंडा' या मराठी सिनेमातून आपल्या भेटीला आलेली अभिनेत्री प्रार्थना बेहरे हे वर्ष कोणत्या घटनेमुळे तिच्या लक्षात राहिले, ते सांगत आहे.
  "हॅलो फ्रेंड्स, 2014 या वर्षाला निरोप देण्याची वेळ हळूहळू जवळ आली आहे. या वर्षभरात आपल्या आयुष्यात काय घडले, याचा आढावा मी घेण्याचा प्रयत्न केला. तोच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. हे वर्ष खासगी आयुष्यापेक्षा करिअरमध्ये मिळालेल्या मोठ्या संधीमुळे माझ्या कायम स्मरणात राहणार आहे. यावर्षी मला माझ्या करिअरमधली दुसरी मोठी फिल्म मिळाली. ती फिल्म म्हणजे 'मितवा'. 9 एक्स झक्कासच्या वतीने आयोजित 'झक्कास हीरोईन' या टॅलेंट हंट शोच्या माध्यमातून माझी निवड या सिनेमासाठी झाली. या टॅलेंट हंट शोमध्ये सहभाग नोंदवल्यामुळे माझ्यावर बरीच टीकासुद्धा झाली. मी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा असूनदेखील टॅलेंट हंट शोमध्ये सहभागी झाली, म्हणून माझ्यावर अनेकांनी टीका केली होती. मात्र टीकाकारांकडे मी लक्ष दिले नाही. कारण या शोमध्ये सहभागी होताना प्रस्थापित अभिनेत्रीने शोमध्ये सहभागी होऊ नये, असे कुठेही नमूद करण्यात आले नव्हते. माझ्याप्रमाणेच नाटक, मालिकांचा अनुभव असलेल्या अनेकजणी या शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. दहा जणींमध्ये रंगलेल्या या स्पर्धेत मी प्रामाणिकपणे माझे बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आणि ही स्पर्धा आपल्या नावे केली. ही स्पर्धा जिंकल्यामुळे 'मितवा'मध्ये मला सेकंड लीड साकारण्याची संधी मिळाली. या सिनेमात मी अवनी हे पात्र साकारले आहे. अवनी प्रार्थनापेक्षा खूप वेगळी आहे. या सिनेमातून माझ्या फॅन्सला वेगळं काही तरी देण्याचा मी प्रयत्न केला आहे. डबिंगसाठीही मी बरीच मेहनत घेतली आहे. पात्राची गरज म्हणून साधा आवाज न काढता बेस देऊन आवाज काढला आहे. त्यासाठी सकाळी 6 ते 10 यावेळी मी दररोज डबिंग केले. शूटिंगदरम्यान स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी यांच्यासोबत खूप छान ट्युनिंग जमले. या सिनेमाच्या रिलीजची मी आतुरतेने वाट पाहात आहे. माझ्या फॅन्सला मी साकारलेली अवनी नक्की भावेल, अशी आशा मी व्यक्त करते. येणा-या काळातसुद्धा उत्तमोत्तम भूमिका साकारण्याची माझी इच्छा आहे. सो फ्रेंड्स, पुढच्या वर्षी थिएटरमध्ये नक्की भेटायला या."
  पुढील स्लाईड्समध्ये पाहा गॉर्जिअस प्रार्थनाच्या आगामी 'मितवा' या सिनेमाचे फस्ट पोस्टर आणि सोबतच तिची ग्लॅमरस छायाचित्रे...
  (शब्दांकनः वैशाली करोले)

  हेही वाचाः आठवणीतील 2014 : 'मालिकेनंतर आता रंगभूमीवरुनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार'

  ​हेही वाचाः आठवणीतील 2014: 'जुळून येती रेशीमगाठी'मुळे घराघरांत पोहोचलो

  ​हेही वाचाः आठवणीतील 2014 : ''प्रियानंतर आता प्रेक्षकांनी प्रगती राजवाडेला स्वीकारले याचा आनंद''

  ​हेही वाचाः आठवणीतील 2014 : 'बाजीराव मस्तानी'द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पणाची मिळाली संधी

  ​हेही वाचाः आठवणीतील 2014 : ''सरते वर्ष ठरले माझ्यासाठी पुढचं पाऊल टाकणारे''

  ​हेही वाचाः आठवणीतील 2014: 'अवताराची गोष्ट' माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव

Trending