आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interview Of Marathi Star Priya Marathe On Remembering 2014

आठवणीतील 2014 : ''प्रियानंतर आता प्रेक्षकांनी प्रगती राजवाडेला स्वीकारले याचा आनंद''

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रः अभिनेत्री प्रिया मराठे)

2014 हे वर्ष आता सरत आले आहे. या वर्षभरात अनेकांच्या जीवनात काही सुखद, तर काही दुःखद घटना घडल्या. कोणत्या तरी घटनेमुळे 2014 हे वर्ष प्रत्येकाच्या कायम लक्षात राहणारे ठरले. सरत्या वर्षाला निरोप देताना आम्ही काही सेलिब्रिटींकडून 2014 हे वर्ष त्यांच्यासाठी कोणत्या घटनेमुळे लक्षात राहिले, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय.
याच सदरात आज अभिनेत्री प्रिया मराठे हे वर्ष कोणत्या घटनेमुळे तिच्या लक्षात राहिले, ते सांगत आहे.
"तू तिथे मी या गाजलेल्या मालिकेने यावर्षी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत मी नकारात्मक भूमिका साकारली होती. प्रियाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले. या मालिकेनंतर काय? असा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच मला 'जयोस्तुते' ही मालिका मिळाली. या मालिकेत मी मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. या मालिकेत माझी प्रगती राजवाडे नावाच्या महिला वकिलाची भूमिका आहे. या मालिकेच्या निमित्ताने एक वेगळा अनुभव मिळाला. भूमिकेसाठी वकिली पेशाचा अभ्यास केला. न्यायालयात वापरल्या जाणा-या भाषेचाही अतिशय बारीकपणे अभ्यास करता आला. प्रेक्षकांनी प्रियानंतर प्रगती राजवाडेला स्वीकारले याचा आनंद आहे. प्रेक्षक भविष्यातही मला असेच भरभरुन प्रेम देतील अशी आशा मी व्यक्त करते. तुम्हा सर्वांना आगामी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा."
पुढील स्लाईड्समध्ये पाहा गॉर्जिअस प्रिया मराठेची खास छायाचित्रे...
(शब्दांकन - वैशाली करोले)

हेही वाचाः आठवणीतील 2014 : 'बाजीराव मस्तानी'द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पणाची मिळाली संधी

हेही वाचाः आठवणीतील 2014 : ''सरते वर्ष ठरले माझ्यासाठी पुढचं पाऊल टाकणारे''