आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interview Of Marathi Star Tejashree Pradhan On Remembering 2014

आठवणीतील 2014 : 'मालिकेनंतर आता रंगभूमीवरुनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रः अभिनेत्री तेजश्री प्रधान-केतकर)

2014 हे वर्ष आता सरत आले आहे. या वर्षभरात अनेकांच्या जीवनात काही सुखद, तर काही दुःखद घटना घडल्या. कोणत्या तरी घटनेमुळे 2014 हे वर्ष प्रत्येकाच्या कायम लक्षात राहणारे ठरले. सरत्या वर्षाला निरोप देताना आम्ही काही सेलिब्रिटींकडून 2014 हे वर्ष त्यांच्यासाठी कोणत्या घटनेमुळे लक्षात राहिले, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय.

याच सदरात आज अभिनेत्री तेजश्री प्रधान-केतकर हे वर्ष कोणत्या घटनेमुळे तिच्या लक्षात राहिले, ते सांगत आहे.
"हे वर्ष करिअरच्या दृष्टीने माझ्यासाठी खूप स्पेशल ठरले आहे. यावर्षी करिअरमध्ये दोन महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. पहिली म्हणजे 'होणार सून मी ह्या घरची' ही मालिका छोट्या पडद्यावर दाखल झाली. अल्पावधीतच मालिकेला प्रेक्षकांची पसंती पावती मिळाली. जान्हवीच्या भूमिकेने मी घराघरांत पोहोचले. प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत असून त्यांच्या खूप चांगल्या प्रतिक्रियासुद्धा मिळत आहेत. या मालिकेने मला झी मराठीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आणि श्री-जान्हवीला सर्वोत्कृष्ट जोडीचा पुरस्कार मिळवून दिला. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढील वर्षी प्रेक्षक मला रंगभूमीवर बघू शकणार आहेत. प्रतिमा कुलकर्णी यांच्या नवीन नाटकात मी काम करत आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटीशेवटी माझे नवेकोरे नाटक रंगभूमीवर दाखल होत आहे. अद्याप आमच्या या नाटकाचे शीर्षक ठरायचे आहे. दोन-तीन शीर्षक डोक्यात आहेत, मात्र अद्याप फायनल शीर्षक लॉक व्हायचेय. नाटाकाच्या तालमींना सुरुवात झाली आहे. हे माझे दुसरे नाटक आहे. यापूर्वी 'फक्त तुझी साथ हवी' या नाटकात मी काम केले होते. या नाटकाला प्रेक्षकांनी पसंत केले होते. आता माझे नवीन नाटकसुद्धा प्रेक्षकांना नक्की आवडेल, अशी आशा आहे."
पुढील स्लाईड्समध्ये पाहा तुमच्या लाडक्या जान्हवीची अर्थातच अभिनेत्री तेजश्री प्रधान-केतकरची खास छायाचित्रे...
(शब्दांकनः वैशाली करोल)

हेही वाचाः आठवणीतील 2014: 'जुळून येती रेशीमगाठी'मुळे घराघरांत पोहोचलो