आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: मुक्ता-अंकुश आजही भरतायत, Home Loan, जाणून घ्या, कसे झाले त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घराचे स्वप्न पाहिल्यानंतर ते घेताना सामान्य माणसाच्या नाकीनऊ येतात. ‘घराचे हफ्ते भरणं’ म्हणजे शहरात राहणा-या मध्यमवर्गीय माणसाच्या वैयक्तिक अर्थिक व्यवस्थापनातला एक महत्वाचा घटक होऊन जातो. मात्र, सेलिब्रिंटींना ह्या सगळ्या दिव्यातून जावे लागत नाही, हा जनमानसात असलेला गैरसमज.
सेलिब्रिटींनाही अनेकदा आपले घर आणि आपली एक गाडी असावी, हे स्वप्न पाहताना सामान्यांसारखीच पायपीट करावी लागते. अभिनेत्री मुक्ता बर्वे मुंबईत येऊन १५ वर्ष झाली. पण मुक्ताला आपलं स्वत:च घर घ्यायला एक तप जाऊ द्यावे लागले. २०१२ला मुक्ताचं स्वत:चं घर झालं. मुक्ता म्हणते, “नाटकात, मालिकांमध्ये फिल्म्समध्ये मिळालेल्या कामातून पैसे साठवत गेले. आणि मुंबईसारख्या ठिकाणी घर घेण्यासाठी पैसे साठवले. आणि शेवटी एकदाच दर अकरा महिन्यांनी मुंबईत भाड्याने राहण्यासाठी घराचा करावा लागणारा करार संपला. आज माझ्या आई-वडिलांना माझं खूप कौतुक आहे. मी माझ्या स्वत:च्या पैशांनी माझं एक छोटंस का होईना, घरकुल बनवलंय. आजही मी घराचे हफ्ते भरतेय. पण गृहस्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद काही आगळाच असतो.”
मुक्ता तर पूण्याहून मुंबईत आली होती. पण मुंबईत राहणा-या अंकुश चौधरीलाही आपलं स्वत:च घर घ्यायला प्लॅनिंग करावे लागले आहे. अंकुश सांगतो,” मी लालबागला लहानाचा मोठा झालोय. मोठं झाल्यावर राहत असलेलं घर छोटं पडायला लागलं होतं. मग सेव्हिंग्ज केली. आणि शेवटी सहा-सात वर्षांपूर्वी लालबागलाच दहा बाय दहाच्या घरातून ७०० sq.ft. घरात गेलो. त्यानंतर पून्हा पैसे जमवले आणि आईच्या नावावरही घर घेतलं. मग दूकान झालं. त्यानंतर आमचं दहा बाय दहाचे घरं असलेली बिल्डींग तोडून आता तिथे 300 sq.ft घर मिळालं. आज त्याचमुळे जेव्हा मी डबलसीट फिल्म केली. तेव्हा त्यातल्या अमितच्या भावना, त्याचं स्ट्रगल हे मला नॉस्टॅलजिक करणार आहे.मी आजही घराचा आणि माझ्या गाडीचा हफ्ता भरतो. तसंच एकमात्र आहे, की घरासाठी पैसे जमवताना कधीही पैसे कमवायचे म्हणून काम घेऊया, असे केले नाही. आणि हे निर्णय घेताना माझ्या कुटूंबियांनीही पैशासाठी माझ्यावर दबाब टाकला नाही.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मुक्ता-अंकुशचे फोटो