आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Navratri Spl : मराठी तारकांनी केला देवीचा जागर, झाल्या भक्तीत तल्लीन, बघा खास व्हिडिओ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवरात्रीत प्रत्येकजण आपल्यापरीने देवीचा जागर करतात. या व्रतात नऊ दिवस व्रतस्थ राहून देवीची मनोभावे आराधना केली जाते. यंदाच्या नवरात्रीत झी टॅाकीज निर्मित ‘दुर्गे दुर्गट भारी’ या आरतीवर महेश टिळेकर व मराठी तारकांनी एकत्रितरित्या पुण्याच्या बागुल उद्यानाच्या महालक्ष्मी मंदिरात देवीची आराधना केली.
 
आरतीतून स्त्री शक्तीला वंदन करत मराठी तारकांनी केलेली आराधना झी टॅाकीजवर प्रेक्षकांना पहाता येईल.  महेश टिळेकरांनी मराठी तारकांच्या माध्यमातून अनेक चांगले कार्यक्रम व उपक्रम आजवर राबवले आहेत. रसिकांनीही या उपक्रमांना चांगली दाद दिली आहे. 
  
चांगल्या संकल्पनांचे व उपक्रमांचे स्वागत झी टॅाकीजने नेहमीच केलं आहे. नवरात्रीचा हा उत्सव अधिक चैतन्यदायी व आनंदमय करण्याचा तसेच प्रेक्षकांना आध्यात्मिक अनुभूती देण्याचा झी टॅाकीजचा उद्देश निश्चितच स्तुत्य आहे. अमृता खानविलकर, सुरभी हांडे, स्मिता शेवाळे, भार्गवी चिरमुले, तन्वी पालव, पल्लवी पाटील, मधुरा देशपांडे, तेजा देवकर, माधवी निमकर या मराठी तारकांनी या आराधनेत सहभाग घेतला होता.

चला तर मग पाहुयात, देवीचा जागर करताना मराठी तारका आणि शेवटच्या स्लाईडवर व्हिडिओ... 
बातम्या आणखी आहेत...