Home »Bollywood »Marathi Cinekatta» Marathi Upcoming Cinema Shubhamkaroti Kalyanam To Release Soon

दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटेंचा सिनेमा होणार रिलीज, सिया पाटीलने साकारली आहे शिक्षिका

दिव्य मराठी वेब टीम | Oct 11, 2017, 13:12 PM IST

मुंबई - मुलांचे प्रश्न आणि त्यांचे बालविश्व दाखवणारे अनेक मराठी चित्रपट अलीकडच्या काळात आलेत. याच पार्श्वभूमीवर लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून मानवी नात्यांचं प्रतिबिंब दाखवणारा शुभं करोति कल्याणम् हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विश्वकर्मा चित्र यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती दिपा भालेराव यांनी केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन शैलेन्द्रसिंह राजपूत यांनी केले आहे.
शुभं करोति कल्याणम् या चित्रपटातून एका ध्येयवेड्या मुलाच्या वेगळेपणाची व त्याला मिळालेल्या चांगल्या साथीची कथा मांडली आहे. आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं स्वप्न पाहिलं जातं तेव्हा लहान मुलं असो वा मोठे त्यांना प्रचंड कष्टाशिवाय यश मिळत नाही, हे सांगत त्यांना लहान वयातच ‘स्वप्न पाहा आणि ती झटून पूर्ण करा’ हे सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. चांगल्या-वाईटाची समज देत लढायला शिकवणाऱ्या या चित्रपटातून मनोरंजनाच्या माध्यमातून सुरेख संदेश दिला आहे.
अश्विनी एकबोटे, सिया पाटील, नरेश बिडकर, अरविंद कोळी, हरिंदर सिंग राणा यांच्यासोबत बालकलाकार तेजल भालेराव, सिद्धेश लिंगायत, विनय शिरसाट, तन्मय म्हात्रे, सानिया पाटील, श्रावणी मेढेकर, राहुल मुळीक, मर्नोवी ओक, सुजल गायकवाड, आकाश शिरसाट यांच्या भूमिका आहेत.
शुभं करोति कल्याणम् या चित्रपटाची कथा, पटकथा गीते बी.विजय यांनी लिहिली असून संवाद शैलेन्द्रसिंह राजपूत यांनी लिहिले आहेत. संकलन चैतन्य तन्ना तर छायांकन सुरेश उतेकर व मनिष पटेल यांनी केलं आहे. नृत्यदिग्दर्शन प्रविण बारिया यांचे असून कलादिग्दर्शन मधु कांबळे यांचं आहे. संगीत राजेश कमल यांनी दिलं असून वैशाली माडे व मंगेश चव्हाण यांनी या चित्रपटातील गीते स्वरबद्ध केली आहेत. कार्यकारी निर्माते विनोद बरई आहेत.
पुढच्या स्लाईडवर पाहा, शुभंकरोती कल्याणम चित्रपटाचे काही फोटोज्...

Next Article

Recommended