आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'थोरातांची कमळा\' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचे हृदयविकाराने निधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'भालू\' या चित्रपटातील उमाताईंचा फोटो. - Divya Marathi
\'भालू\' या चित्रपटातील उमाताईंचा फोटो.
मुंबई- ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे (७२) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने शीव येथील निवासस्थानी बुधवारी सकाळी निधन झाले. भालजी पेंढारकर यांच्या “आकाशगंगा’ या चित्रपटापासून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली होती. त्यानंतर त्यांचे “थोरातांची कमळा’, “अंतरीचा दिवा’, “भालू’ या चित्रपटांतील भूमिका विशेष गाजल्या. उमा भेंडे यांच्या पश्चात पती प्रकाश भेंडे, दोन मुले प्रसाद व प्रसन्न भेंडे, सुना किमया व श्वेता भेंडे आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दादर पश्चिम येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत रात्री आठ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.  

गेल्या काही महिन्यांपासून त्या हृदयविकाराने त्रस्त होत्या. वयोमानामुळे त्यांची तब्येतही खालावलेली होती. १९६०, १९७० च्या दशकांत उमा भेंडे यांनी अनेक चित्रपटांतून संस्मरणीय भूमिका केल्या. “हवास तू’ हे त्यांचे गाणे खूपच गाजले होते. “गुडिया हमसे रुठेगी’ हे हिंदीतील त्यांच्यावर चित्रित करण्यात आलेले गाणेही गाजले होते.   

लतादीदींनी नाव बदलले    
उमा भेंडे यांचा जन्म १९४५  मध्ये कलेचा वारसा लाभलेल्या कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव अनुसया साक्रीकर होते. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांचे नाव बदलून उमा असे ठेवले. उमा यांची आई रमादेवी प्रभात कंपनीत काम करत असे. भेंडे यांचे वडील श्रीकृष्ण साक्रीकर हे अत्रे यांच्या कंपनीत कामाला होते. अशा कुटुंबात लहानाची मोठी झाल्यामुळे उमा भेंडे  यांना बालवयातच अभिनयाचे धडे मिळाले. कोल्हापूरला पूर्वी गणेशोत्सवापासून विविध प्रसंगी मेळे होत. त्यामध्ये उमा भेंडे सहभागी होत असत. त्यांच्या आईने त्यांना भालजी पेंढारकर यांच्याकडे नेले. त्यांनी तिला आकाशगंगा चित्रपटात काम करण्याची संधी दिली.  त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. मधुचंद्र, आम्ही जातो आमुच्या गावा, काका मला वाचवा, अंगाई, मल्हारी मार्तंड, भालू, स्वयंवर झाले सीतेचे अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी वैविध्यपूर्व भूमिका केल्या.
 
 भेटा उमा भेंडेच्या सून-मुलाला, सून प्रसिद्ध अभिनेत्री तर मुलगा आहे सिनेमॅटोग्राफर
 
साठ व सत्तरच्या दशकातील अनेक चित्रपटांतून  उमा भेंडे  संस्मरणीय भूमिका केल्या होत्या. 1960 साली 'आकाशगंगा' या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. मधुचंद्र, आम्ही जातो आमुच्या गावा, अंगाई, काका मला वाचवा, शेवटचा मालुसरा, मल्हारी मार्तंड, भालू, स्वयंवर झाले सीतेचे हे त्यांचे गाजलेले मराठी चित्रपट आहेत. त्यांनी मराठीसोबतच हिंदी, छत्तीसगढी आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले.  कोल्हापूरच्या असलेल्या उमाताईंचं मूळ नाव अनसुया असं होतं. 'हवास तू' हे त्यांचं गाणं खूपच गाजलं होतं. 'गुडिया हमसे रुठेगी...' हे हिंदी गाणंही त्यांच्यावरच चित्रित करण्यात आलं होतं.
 
पुढे वाचा, उमाताईंचे खरे नाव होते अनसुया... 
पहिल्या चित्रपटासाठी मिळाले होते 100 रुपये... 
भालजींच्या आशीर्वादाने सुरु झाला होता रुपेरी पडद्यावरचा प्रवास...
लग्नाला होता आईचा विरोध... यांसह त्यांच्याविषयी बरंच काही 
बातम्या आणखी आहेत...