Home »Bollywood »Marathi Cinekatta» Marathi Writer Arvind Jagtap On Sonu Nigam Tweet

प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप का म्हणाले- सोनू निगम बोलला ते योग्यच पण...

दिव्य मराठी वेब टीम | Apr 21, 2017, 09:26 AM IST

औरंगाबाद - सोनू निगमने अजानबद्दल केलेले वक्त्यव्य योग्यच होते, पण धर्म आणि राष्ट्रभक्ती या काही पैजा लावण्याच्या गोष्टी नसल्याचे रोखठोक मत प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी व्यक्त केले. सर्वच मिरवणूकांमध्ये एकाच गाण्यावर नाचणार असाल तर विविध जाती-धर्मांच्या वेगवेगळ्या मिरवणुका हव्यात कशाला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

'चला हवा येऊ द्या'मधील ह्रदयस्पर्षी पत्रांनी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले लेखक-कवी अरविंद जगताप एका कार्यकर्माच्या निमित्ताने बुधवारी औरंगाबादमध्ये आले होते. यावेळी Divyamarathi.com ने त्यांच्यासोबत खास बातचीत केली. त्यांना पत्रांचे विषय कसे सुचतात यापासून सध्या देशभर गाजत असलेल्या सोनू निगमच्या ट्विटपर्यंत विविध विषयांवर अरविंद यांनी दिलखुलास बातचीत केली.
सोनू निगमचे म्हणणे काही प्रमाणात योग्यच...
- अरविंद म्हणाले, 'सोनू निगमने सुरुवातीला म्हटले ते काही प्रमाणात योग्यच होते. 'बॉलिवूड गायक सोनूने अजानमुळे झोपमोड होत असल्याचे ट्विट केले होते. त्यासोबतच त्याने मंदिर आणि गुरुद्वारा येथील लाऊडस्पिकरमधून होणाऱ्या पुजांमुळेही सारखाच त्रास होत असल्याचे ट्विटमध्ये म्हटले होते.
- यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात अरविंद म्हणाले, 'धर्म आणि राष्ट्रभक्ती या काही पैजा लावण्याच्या गोष्टी नाही. मात्र कोणीही त्यावर बोलू शकतो.' माझ्या मुस्लिम मित्रांसोबत मी या विषयावर बोलतो. त्यांना सांगतो... अरे यार त्याचा त्रास होतो. पण असे बोलतो म्हणजे फार काही मोठा पराक्रम करतो, असेही नाही अशी पुस्तीही अरविंद यांनी जोडली.
- ते म्हणाले, 'माझ्या धर्मातही यापेक्षा वेगळे काय आहे. तेथेही घंटा वाजतच असतात. तेवढी 15-20 मिनिटे सर्वकाही बंद असते. टीव्ही देखील तेवढा वेळ शांत असतो.'
मिरवणूकांवर उपस्थित केला सवाल
- अरविंद जगताप म्हणाले. सध्या कोणत्याही धर्माची - महापुरुषांच्या जयंतीची मिरवणूक पाहा. सर्व ठिकाणी एकच गाणे वाजत असते.. शांताबाई.
- कोणत्याही जाती-धर्माच्या आणि महापुरुषांच्या मिरवणुकीत एकच गाणे वाजणार असेल तर मग मिरवणुकातरी कशाला वेगळ्या काढायच्या? असा थेट सवाल जगताप यांनी उपस्थित केला.
- ते म्हणाले, 'शांताबाई गाणे लावायचे आणि सर्वांनाच म्हणायचे या आता नाचायला.'
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended