Home »Bollywood »Marathi Cinekatta» Marathi Writer, Poet Arvind Jagtap Intervie Special

Exclusive:..अरविंद जगताप यांनी लिहिली आहेत 100 हून अधिक प्रेमपत्रे

दिव्य मराठी वेब टीम | Apr 21, 2017, 09:27 AM IST

  • लेखक अरविंद जगताप
'चला हवा येऊ द्या' हा शो लागला रे लागला की सर्वत्र एकच हशा पिकतो. लोकांना मनापासून हसायला लावणाऱ्या मालिकेवर सर्वच मराठी प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केले आहे. या शो मधील एकच असा क्षण येतो जेव्हा सर्वच निशब्द होतात आणि हास्यकल्लोळाची जागा घेतात डोळ्यातील पाणी. आपल्या लेखणीने ही किमया कोण करु शकतो, असा विचार तुमच्याही मनात आला असेल. त्याचे उत्तर आहे अरविंद जगताप. लेखक, कवी असलेले अरविंद जगताप यांनी दिव्य मराठी टीमशी बोलतांना त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलू उलगडून दाखवत दिलखुलास गप्पा मारल्या.
जाणून घ्या त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत..
लिखाणाचा प्रवास कधी आणि कसा सुरु झाला?
अगदी शाळकरी वयापासून मला लिखाणाची आवड होती. त्यामुळे कॉलेजमध्ये म्हणजे केवळ अकरावीत असताना माझा एका वर्तमानपत्रात कॉलम चालत असे. त्या कॉलममध्ये मी इतर लेखकांच्या लिखाणाची टिंगलटवाळी करण्याचे काम करत असे. यामुळे तसा मी तेव्हापासून प्रसिद्ध झालो. अनेकजण यामुळे सुखावलेही आणि कोणी कोण हा अरविंद जगताप अशा आवेशात येत असत. कॉलेजमध्ये असताना जवळपास 100 प्रेमपत्र मित्रांना लिहून दिली. कॉलेजदरम्यान काय करिअर करावे, हा प्रश्न सर्वत्रबाजूंनी सुरु झाला आणि लेखक बनण्याचा ध्यास घेत ते स्वप्न पूर्ण करायचे ठरविले.
लेखक बनण्याच्या प्रवासात अडचणी कोणत्या आल्या?
लहान असताना आईला माझी फार काळजी वाटे. माझे वडिल कंडक्टर, इतर दोन भाऊ अभ्यासात हुशार पण मला फिरण्याचा शौक. त्यामुळे आईने माझा फिरण्याचा शौकही पूर्ण व्हावा आणि माझ्या पोटापाण्याचीही व्यवस्था व्हावी यासाठी मला कंडक्टर बनण्याच्या सल्ला दिला. त्यात मातृकाळजी होती ती वेगळी गोष्ट पण लेखकच बनवायचे मी ठरविले होते. कुठेही नोकरी न करता केवळ लेखकच बनायचे आणि त्यावरच आयु्ष्य जगवून दाखवायचे हे ठरविले आणि आजही ती गोष्ट पाळत असल्याचा मला आनंद वाटतो.
पुढच्या स्लाईडवर पाहा, यशस्वी होण्याचा काय दिला कानमंत्र..

Next Article

Recommended