आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Sci-Fi: फुंतरूचा झाला महूर्त, केतकी बनलीय, रोबोट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'फुंतरू' चित्रपटाचा फस्ट लूक
स्टारवॉर्स, जुरॅसिक वल्ड, अव्हेंजर्स, मॅडमॅक्स अशा सायन्स फिक्शन हॉलिवूडपटांचे फॅन्स असलेल्या प्रेक्षकांसाठी एक गुड न्यूज आहे. आता मराठी सिनेसृष्टीतही एक सायन्स फिक्शन फिल्म बनतेय. ह्या फिल्मचं नाव आहे, ‘फुंतरू’.
दिग्दर्शक सुजय डहाके ह्या सायन्स फिक्शन फिल्म ‘फुंतरू’चे दिग्दर्शन करणार आहे. चित्रपटाची कथाही त्यानेच लिहीलीय. फुंतरूचा फस्ट लूक नुकताच सुजय डहाकेने रिव्हील केलाय. केतकी माटेगांवकर ह्या फिल्ममध्ये एक रोबोट झालेली आपल्याला दिसेल. 'शाळा'नंतर आता पुन्हा एकदा सुजय आणि केतकी एकत्र आले आहेत
केतकीचा लूक खूपच इंटरनॅशनल स्टाइलचा ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचं दिसून येतंय. केतकीच्या ह्या भूमिकेचा लूक डिझाइन केलाय, विनोद सरोदे ह्यांनी तर कॉस्च्युम डिझाइन केलेत, आयुषी दगडने.
फुंतरू नावाप्रमाणेच वेगळी आहे. ही मराठीतील पहिली सायन्स फिक्शन फिल्म असणार आहे. एका मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याची ही कथा आहे. हा विद्यार्थी नवीन मशीन बनवण्याच्या वेडाने झपाटलेला असतो. आणि तो एक अद्भूत रोबोट बनवतो. आणि हा रोबोट, एक मुलगी असते. आणि तो त्या रोबोटच्या प्रेमात पडतो. ‘लव्ह कॅन फाइंड यू इन मेनी वेज’ ही चित्रपटाची टॅग लाइन आहे.
नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त पुण्यातल्या गोखले इन्टिस्टयुटमध्ये करण्यात आला. केदार शिंदे दिग्दर्शित ‘अगं बाई अरेच्चा-२’ या चित्रपटाद्वारे मराठी फिल्म डिस्ट्रीब्युशनमध्ये पाऊन ठेवल्यावर आता ईरॉस इंटरनॅशनल मराठी चित्रपटांच्या निर्मितीमध्ये सुध्दा सक्रिय झालंय. आणि त्यांची ‘फुंतरू’ ही पहिली निर्मिती असणार आहे
केतकी माटेगांवकरच्या सोबतच मदन देवधर, शिवराज वैचळ, शिवानी रंगोले, ऋतुराज शिंदे, अंशुमन जोशी आणि रोहित निकम हे कलाकार आपल्याला फुंतरूमध्ये दिसणार आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, फुंतरू चित्रपटातला केतकी माटेगांवकरचा लूक