आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Vacation Pics: पूजा सावंतपासून उर्मिला कोठारेपर्यंत व्हॅकेशनमध्ये बिझी आहेत हे मराठी सेलेब्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - डिसेंबर महिना म्हटला की सर्वांचीच व्हॅकेशन प्लॅनिंग करण्यास सुरुवात होते. त्यात मराठी सेलिब्रेटीही मागे नाही. कामानिमित्त म्हणा अथवा कुटुंबाला वेळ देण्यासाठी मराठी सेलिब्रेटीही सध्या व्हॅकेशन मोडवर आहेत. सई ताम्हणकरने नुकताच तिचा हिमालयाच्या पर्वतांवरील विमानातून घेतलेला फोटो शेअर केला आहे तर अभिनेता अमेय वाघ पत्नीसह नेदरलँडला रवाना झाला आहे. अमेय व्हॅकेशन कम त्याच्या फास्टर फेणे चित्रपटाच्या 'पुलोत्सव पूर्वरंग' या कार्यक्रमात होणाऱ्या स्क्रिनींगसाठी निघाला आहे. 

 

अभिनेत्री पूजा सावंत तिच्या बहिणीसोबत थायलँडमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे तर संस्कृतीने तिचा थायलंडला निघताना विमानतळावरील फोटो शेअर केला आहे. निर्माता निपूण धर्माधिकारीही 'पुलोत्सव पूर्वरंग' या कार्यक्रमासाठी नेदरलँडला पोहोचला आहे. मॉडेल मिलींद सोमणने त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचे नॉर्वे येथील व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्री उर्मिला कानिटकर पेंच अभयारण्यात पतीसोबत बेबीमून सेलिब्रेट करत आहे. अभिनेत्री नेहा पेंडसेनेही तिच्या मालदीवच्या व्हॅकेशनचे हॉट फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधले होते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मराठी सेलिब्रेटींचे त्यांच्या व्हॅकेशन दरम्यानचे काही खास PHOTOS....

बातम्या आणखी आहेत...