आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेंदी, संगीत, लग्न, रिसेप्सन : बघा बघा \'अस्मिता\' फेम मयुरी-पियुषच्या लग्नाचा Wedding Album

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः झी मराठी वाहिनीवरील अस्मिता या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री मयुरी वाघ 1 फेब्रुवारी विवाहबद्ध झाली. 'अस्मिता' या मालिकेतील तिचा जोडीदार असलेला अभिनेता पियुष रानडेसोबत मयुरीने सप्तपदी घेतल्या. बडोद्याला मयुरी आणि पियुषचा हा लग्नसोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. त्यांच्या लग्नाला 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्री श्रेया बुगडे आणि तिचा पती निखिल सेठ उपस्थित होते. 30 जानेवारी रोजी मयुरीचा मेहंदीचा कार्यक्रम देखील पार पडला. त्यानंतर संगीत सेरेमनीही झाली. 
 
पियुष आणि मयुरी यांची ओळख झी मराठीवरील ‘अस्मिता’ या मालिकेत झाली होती. त्यानंतर हे दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात या दोघांचा साखरपुडा झाला होता.  मयुरी वाघची 'अस्मिता' ही मालिका देखील आता संपली आहे. त्यामुळे थोडं कामातून वेळ काढून या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पियुष हा संजय लीला भन्साळी यांची निर्मिती असलेल्या ‘लाल इश्क’ या सिनेमातून प्रेक्षकांना भेटीला आला आहे. तर मयुरीने ‘वचन दिले तू मला’, ‘ही वाट दूर जाते’, ‘मेजवानी’, ‘सुगरण’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. मयुरीचे हे पहिले तर पियुषचे हे दुसरे लग्न आहे.
 
या पॅकेजमधून आम्ही तुमच्यासाठी मयुरी-पियुषच्या मेंदी, संगीत, लग्न आणि रिसेप्शनच्या फोटोजचे खाल कलेक्शन घेऊन आलो आहोत.  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, मयुरी-पियुषचा Wedding Album... 
 
बातम्या आणखी आहेत...