आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लव्ह लग्न लोचा'मध्ये मॉर्डन मुलीची भूमिका साकारणार मयुरी, खासगी आयुष्यातही आहे ग्लॅमरस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'अस्मिता' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मयुरी वाघ आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर अभिनय करताना दिसणार आहे. सहा ते सात महिन्यांच्या ब्रेकनंतर मयुरी छोट्या पडद्यावर परतली आहे. झी युवावरील 'लव्ह लग्न लोचा' या मालिकेत मयुरीची एन्ट्री होणार आहे.  सध्या या मालिकेत बरीच धमाल सुरू आहे. आकांशा आणि श्रीकांत यांच्या लग्नाचा घोळ आणि विनय आणि गॅंगने केलेली धमाल, अभिमान आणि शाल्मलीच्या आयुष्यात येणाऱ्या बाळाची चाहूल, राघव आणि काव्याचे प्रेम प्रकरण या सर्वांमुळे ही मालिका आणखीन रंगतदार घडत आहे. सुमित आणि सौम्याच्या एक्सिट नंतर त्यांच्या जागी आता, कोणी येणार की नाही या बद्दल प्रेक्षकांना शंकाच होती. मात्र आता लव्ह लग्न लोचा मध्ये एका नवीन पात्राची एंट्री होणार आहे. ऋतू हे या नवीन पात्राचे नाव असून, सर्वांची लाडकी अभिनेत्री मयुरी वाघ ही भूमिका साकारणार आहे.
 
मॉर्डन मुलीची साकारणार भूमिका... 
या मालिकेत मयुरी ऋतू हे पात्र साकारणार असून ही अतिशय स्मार्ट आणि अतिशय मॉडर्न मुलगी आहे. तिच्या आयुष्यात तिचं स्वतःच करिअर सगळ्यात महत्वाचं असून तिला लग्न करण्याची इच्छा नाही आहे. सध्या लव्ह लग्न लोचा मध्ये काव्या ही सगळ्यात बिनधास्त कॅरेक्टर आहे पण ऋतू ही तिच्यापेक्षा जास्त बिनधास्त असणार आहे. ऋतू ही लेखिका असून ती वृत्तपत्र आणि मासिकांसाठी प्रेम, नातेसंबंध या विषयांवर लेख लिहीत असते. मात्र यामधील कोणत्याही प्रकारची भावना आजपर्यंत तिने अनुभवली नाही आहे. आता ही ऋता आपल्या लव्ह लग्न लोचाच्या टीम मध्ये कशी फिट बसते हे बघणे महत्वाचे ठरेल. 

'लव्ह लग्न लोचा' मालिकेत मॉर्डन मुलीची भूमिका वठवणारी मयुरी खासगी आयुष्यातसुद्धा अतिशय ग्लॅमरस आहे. तिचे हे मॉर्डन रुप आता आपण छोट्या पडद्यावर बघणारच आहोत,
 
तत्पूर्वी पाहुयात, मयुरीची खासगी आयुष्यातील ग्लॅमरस छायाचित्रे...   
 
 
बातम्या आणखी आहेत...