आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लवकरच डबाबंद होणार 'सौभाग्यवती', ही मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी ‘माझे पती सौभाग्यवती’ मालिका लवकरच डबाबंद होणार आहे. या मालिकेची जागा आता ‘खुलता कळी खुलेना’ ही नवी मालिका घेणार आहे. 18 जुलैपासून रात्री 8.30 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ओमप्रकाश शिंदे आणि मयुरी देशमुख दोघे या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत.
वैभव मांगले आणि नंदिता धुरी यांची मुख भूमिका असलेली ‘माझे पती सौभाग्यवती’ मालिका 28 सप्टेंबर 2015 रोजीपासून प्रसारित होत आहे. 'मी लवकरच येतेय’ आणि आता ‘घरातील साखर संपलीय का’सारख्या जाहिरातींमुळे ‘सौभाग्यवती’ मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. परंतु मालिका सुरु झाल्यावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला ‘सौभाग्यवती’ला काही जमले नाही. शिवाय टीआरपी चार्टमध्येही ही मालिका कुठेच दिसत नाही. त्यामुळेच मालिकेचा गाशा गुंडाळला लागला, असे म्हटले जात आहे.
या मालिकेत, वैभव मांगले, नंदिता धुरीसह अशोक शिंदे, रमेश भाटकर, उदय सबनीस यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
अशी आहे मालिकेची कथा?
इंडस्ट्रीमध्ये नाव आणि काम मिळवण्यासाठी एक कलाकार कशी धडपड करतो, त्याच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेमुळे त्याची कशी तारांबळ उडते, ते या मालिकेत पाहायला मिळत आहे. वैभव मालवणकर हा कलाकार कोकणातून मुंबईत आला असून त्याचे लग्न झाले आहे. चांगले काम किंवा भूमिका मिळावी, यासाठी त्याची धडपड सुरु असते. पण पुढे त्याच्या आयुष्यात एक घटना घडते आणि त्याला ‘स्त्री’ पात्र रंगवावे लागते. त्याला आयुष्यात पुरुष आणि स्त्री अशा दोन्ही भूमिका कराव्या लागतात. आपली स्वत:ची ओळख पुसून नवीन ओळख त्याला निर्माण करावी लागते. यातून जे-जे नाट्य, विनोद, प्रसंग घडतात ते या मालिकेत मांडण्यात आले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मालिकेच्या सेटवरील PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...