Home »Bollywood »Marathi Cinekatta» Mazya Navryachi Bayko Fame Actress Anita Date Interview On Gudipadawa

सेलिब्रिटींचा गुढीपाडवा : 'त्या' गुढीबरोबर आता दिवसभर कोणीच नसते!

समीर परांजपे | Mar 25, 2017, 00:28 AM IST

'माझ्या नव-याची बायको' या मालिकेमधून उत्तम काम करणारी व गुणी अभिनेत्री अनिता दाते- केळकर हिच्या गुढीपाडव्याविषयीच्या खूप छान आठवणी आहेत.

अनिता सांगते, 'मी मुळ नाशिकची. गेल्या 10 वर्षांपासून कामानिमित्त मुंबईत राहायला आले. त्यामुळे आता सगळ्याच सणवारांना नेहमीच नाशिकच्या आमच्या दातेवाड्यात जाणे शक्य होत नाही. पण लहानपणीची मजा सांगते. दाते वाड्यात आम्ही सगळे पूर्वी एकत्र कुटंबपद्धतीने राहात होतो. माझी आजी गुढी उभारण्याची सर्व तयारी करुन द्यायची. मग माझे बाबा सकाळी गुढी उभारायचे. अगदी साध्या पद्धतीने हा सर्व समारंभ व्हायचा. गुढीला आमच्याकडे साधे रेशमी वस्त्र लावलेले असायचे. आता अनेकांकडे गुढी उभारताना भरजरी कापड किंवा साड्यांचा वापर केला जातो तसे काही आमच्याकडे नव्हते. गुढीपाडवा असो वा कोणताही सण सगळे दाते कुटुंबीय त्या दिवशी एकत्र येऊन तो सण आनंदाने साजरा करतात.

पुढे वाचा, अनिता सांगते, दातेंच्या घरी गुढीसमोर ठेवले जायचे दाते पंचांग...

Next Article

Recommended