Home »Bollywood »Marathi Cinekatta» Medha Majarekars 50th Birthday Celebration

महेश मांजरेकरांनी सेलिब्रेट केला पत्नी मेधाचा B'day, जंगी पार्टीत मराठी सेलेब्सची धमाल

दिव्य मराठी वेब टीम | Jul 17, 2017, 15:11 PM IST


एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेते-निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पत्नी आणि अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी 14 जुलै रोजी वयाची 50 वर्षे पूर्ण केली. मेधा यांच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका जंगी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टीत मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावून भरपूर धमाल केली. यावेळी पंजाबी ढोलच्या तालावर सेलिब्रिटींनी ताल धरला होता. सचिन खेडेकर, पुष्कर श्रोत्री, भारती आचरेकर, जयवंत वाडकर, सोनाली खरे, शिवाजी साटम, नीना गुप्ता, राहुल रानडे, सुनील बर्वे, मनवा नाईक यांच्यासह अनेक मराठी सेलिब्रिटी मेधा यांच्या बर्थडे पार्टीत सहभागी झाले होते. मेधा यांनी नटसम्राट, काकस्पर्श, फक्त लढ म्हणा, बंध नायलॉनचे या सिनेमांत अभिनय केला आहे.

या बर्थडे पार्टीची खास झलक दाखवणारे फोटोज बघा, पुढील स्लाईड्सवर...

Next Article

Recommended