आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खानविलकरांची अमृता आज चढणार बोहल्यावर, भेटा तिच्या कुटुंबीयांना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आईवडील आणि थोरल्या बहिणीसोबत अभिनेत्री अमृता खानविलकर )

मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमडॉल अमृता खानविलकर आज मुळ दिल्लीचा असलेल्या हिमांशू मल्होत्रासोबत विवाहबद्ध होतेय. दिल्लीत या दोघांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. राजू आणि गौरी खान यांची अमृता धाकटी मुलगी आहे. अमृताला एक थोरली बहीण असून तिचे नाव आदिती आहे. किंगफिशर एअरलाइन्समध्ये आदिती एअर होस्टेस म्हणून काम करते.
अमृताचा जन्म 23 नोव्हेंबर 1984 रोजी मुंबईत झाला. तिचे शालेय शिक्षण पुण्याच्या कर्नाटक हायस्कूल येथे झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयात झाले.
अमृताने मराठीसोबतच हिंदी सिनेमांमध्येही अभिनय केला आहे. शिवाय मराठी टेलिव्हिजनवर काही कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनही केले आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अमृताच्या कुटुंबीयांची भेट घालून देत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा अमृताच्या कुटुंबीयांची खास छायाचित्रे...