आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet Well known Actor Atul Kulkarni\'s Wife Geetanjali Kulkarni

\'कोर्ट\'मध्ये वकिलाची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री आहे अतुल कुलकर्णीची पत्नी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('कोर्ट' सिनेमातील एका दृश्यात गीतांजली कुलकर्णी, पती अतुलसोबत गितांजली)
राष्ट्रीय पुरस्कारावर आपलं नाव कोरत 'सुवर्णकमळ' आपल्या नावी करणारा मराठी सिनेमा म्हणजे कोर्ट. आज (17 एप्रिल) हा सिनेमा आपल्या भेटीला आला आहे. या सिनेमात वकीलाची महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी अभिनेता अतुल कुलकर्णीची पत्नी आहे. सात वर्षांपूर्वी अतुल आणि गीतांजली यांनी प्रेमविवाह केला. एनएसडीमध्ये दोघांची भेट झाली होती. काही दिवसांपूर्वी एका शोमध्ये शोमध्ये अतुल कुलकर्णी यांनी आपल्या प्रेमविवाहाविषयी सांगितले होते.
अतुल यांनी सांगितले होते, ''मी प्रेमात पडलो किंवा प्रेमात कसा अडकलो हे माझे मलाच पडलेले कोडे आहे. मी प्रेमात पडलो आणि विवाहबद्ध झालो, हा माझ्या घरच्यांसाठीसुद्धा आश्चर्याचा धक्का होता. कारकिर्दीच्या प्रत्येक टप्प्यावर कलाकार म्हणून बदलत गेलो. सोलापुरात एक नाटक केले. त्या नाटकाने मला रंगभूमीच्या प्रेमात पाडले. त्यानंतर एनएसडी गेलो. एनएसडीत गीतांजलीबरोबर ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात आणि नंतर लग्नात झाले.'' गीतांजली यांनी म्हटले होते, ''परफेक्शनिस्ट अतुलची पत्नी असण्यापेक्षा मी त्याची शिष्य किंवा फॉलोअर अधिक बनलेय.''
गीतांजली या रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. ‘सेक्स, मोरॅलिटी अँड सेन्सॉरशिप’, ‘गजब कहानी’, ‘ड्रीम्स ऑफ तलीम’, ‘पिया बहुरुपिया’ यांसारख्या नाटकांमध्ये काम आणि ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधून अभिनयाचे शिक्षण ही त्यांची पार्श्वभूमी आहे.
'कोर्ट' या सिनेमात गीतांजली कुलकर्णी यांनी ‘नूतन’ या पब्लिक प्रोसिक्युटरची भूमिका साकारली आहे. नूतन ही एका मध्यमवर्गीय घरातील स्त्री आहे. मध्यमवर्गीय मानसिकतेचे प्रतिनिधित्व ती करते. ऑडिशन, कार्यशाळा, कोर्टातील काम कसे चालते हे समजून घेण्यासाठी मुंबईतील सेशन कोर्टात केसेसना हजर राहणे, असे करत सहा महिने या भूमिकेवर काम केल्यानंतर या भूमिकेसाठी गीतांजली यांची निवड झाली.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा गितांजली आणि अतुल कुलकर्णीची खास छायाचित्रे...