आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे महेश मांजरेकरांची ग्लॅमरस लेक, हिच्या नावावर सुरु केले प्रॉडक्शन हाऊस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकरांनी नुकतीच वयाची 64 वर्षे पूर्ण केली आहेत. 16 ऑगस्ट 1953 रोजी मुंबई येथे त्यांचा जन्म झाला. मांजरेकरांनी केवळ मराठीतच नव्हे तर बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. त्यांच्या खासगी आयुष्याविषयी सांगायचे झाल्यास, महेश यांनी दोनदा लग्न केले आहे. त्यांचे पहिले लग्न दीपा मेहता यांच्यासोबत झाले होते. तर काकस्पर्श, नटसम्राट या गाजलेल्या सिनेमांमध्ये झळकलेल्या अभिनेत्री मेधा मांजरेकर या त्यांच्या दुस-या पत्नी आहेत. महेश यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. अश्वमी हे त्यांच्या थोरल्या मुलीचे तर सत्या हे मुलाचे नाव आहे. अश्वमी आणि सत्या ही महेश आणि त्यांची पहिली पत्नी दीपा यांची मुले आहेत. दुसरी पत्नी मेधापासून त्यांना सई ही एक मुलगी आहे. 

महेश मांजरेकरांनी थोरली मुलगी अश्वमी हिच्या नावावरुन प्रॉडक्शन हाऊस सुरु केले आहे. अश्वमी फिल्म्स प्रा. लि. हे त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव असून मातीच्या चुली, शहानपण देगा देवा, शिक्षणाच्या आयचा घो, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या गाजलेल्या सिनेमांची निर्मिती या प्रॉडक्शन हाऊसमध्ये करण्यात आली आहे. 

अश्वमीचा जन्म 29 ऑगस्ट 1988 रोजी झाला. अश्वमी सोशल मीडियावर अॅक्टिव असून ती स्वतःचे फोटोज इन्स्टाग्राम, फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइट्सवर शेअर करत असते.   

पाहुयात, अश्वमी मांजरेकर हिची निवडक छायाचित्रे... 
बातम्या आणखी आहेत...