मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना
आपण ओळखतो. मात्र फार थोड्या जणांनी या कलाकारांच्या मुलामुलींना पाहिले आहे. एखाद दुस-या कार्यक्रमात हे मराठी कलाकार आपल्या मुलांबरोबर दिसतात. अलीकडेच अभिनेता अंकुश चौधरी आपल्या मुलासोबत जेजुरीला गेला होता. तेथे क्लिक झालेले या दोघांचे हे छायाचित्र पहिल्यांदाच समोर आले आहे. आजवर अंकुशचे त्याच्या मुलासोबतचे सार्वजनिक ठिकाणी क्लिक झालेले छायाचित्र समोर आले नव्हते.
अंकुशच नव्हे तर मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींच्या मुलांची झलक अद्यापही त्यांच्या अनेक चाहत्यांनी बघितलेली नसावी. आज आम्ही तुम्हाला या पॅकेजच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारांच्या मुलामुलींशी भेट घालून देणार आहोत.
चला तर मग अंकुशच्या मुलानंतर आता भेटुयात सुबोध भावे, प्रियदर्शन जाधव, भारत गणेशपुरे, भरत जाधव, रेणुका शहाणेसह मराठीतील नावाजलेल्या सेलिब्रिटींच्या मुलांना...