आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेय वाघला गवसली त्याची Valentine, भेटा मराठी इंडस्ट्रीतील रिअल लाईफ जोडीदारांना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी फिल्म इंडस्ट्रीतलेही अनेक कलाकार अलीकडेच रेशीमगाठीत अडकले. अस्मिता फेम अभिनेत्री मयरी वाघ आणि पियुष रानडे हे याचवर्षी साता जन्माच्या गाठीत अडकले. तर मृण्मयी देशपांडे, पल्लवी पाटील आणि अभिनेता संग्राम समेळ  या कलाकारांनी अलीकडेच सप्तपदी घेतल्या. तर काही कलाकारांना लग्नाचे वेध लागले आहेत. विशेष म्हणजे 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता अमेय वाघलासुद्धा त्याची व्हॅलेंटाईन गवसली आहे. आज व्हॅलेंटाईन डेचे औचित्य साधत अमेयने त्याची व्हॅलेंटाईन कोण आहे? याचा खुलासा सोशल मीडियावर एक फोटो अपलोड करुन केला आहे. अभिनेत्री मिथिला पालकर हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली अमेयने दिली आहे. मिथिलासोबतचा एक फोटो फेसबुकवर अपलोड करुन अमेयने लिहिले, ''Finally ❤ #myvalentine''

आज व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला मराठी फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींच्या रिअल लाईफ जोडीदाराची ओळख करुन देत आहोत.
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा मराठी सेलिब्रिटींचे रिअल जोडीदार...
बातम्या आणखी आहेत...