आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE : जाणून घ्या रंगभूमीवरच्या \'इंदिरा गांधी\'बद्दल...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः दिग्दर्शक रत्नाकर मतकरी, अभिनेत्री सुप्रिया विनोद, अभिनेता विक्रम गायकवाड आणि अभिनेता नकुल घाणेकर)
सुप्रसिध्द नाटककार रत्नाकर मतकरी आपलं महत्वाकांक्षी नाटक ‘इंदिरा’ 28 मे पासून रंगभूमीवर घेऊन येतायत. इंदिरा गांधी यांच्या शेवटच्या 9 वर्षांच्या राजकिय आणि वैयक्तिक जीवनावर या नाटकाद्वारे प्रकाश टाकण्यात आलाय.
गांधी कुटूंबातील इंदिरा, राजीव आणि संजय या प्रमुख भूमिकांचा आणि त्या साकारणा-या कलाकारांचा हा परिचय...
इंदिरा गांधी
इंदिरा गांधींची सशक्त व्यक्तिरेखा साकारली आहे, अभिनेत्री सुप्रिया विनोद हिने. तसं सुप्रियाला ‘यशवंतराव बखर एका वादळाची’ या चित्रपटामधनं इंदिरा गांधीच्या भूमिकेतनं प्रेक्षकांनी पाहिल्यावर पुन्हा एकदा सुप्रिया ही भूमिका साकारतेय. “खरं तर त्या सिनेमात मी तरूण इंदिरेच्या भूमिकेत होते. आणि या नाटकात इंदिराजींच्या आयुष्यातली शेवटची नऊ वर्षं दाखवल्याने, त्याच्यातली आई, आजी, प्रगल्भ राजकारणी, त्यांची मुत्सद्देगिरी, असे अनेक कंगोरे मला दाखवायचे होते. त्यामुळे त्यांच्यावर बारकाईने अभ्यास करावा लागला. आणि हे करताना इंदिराजींचं आत्तापर्यंत माहित नसलेलं व्यक्तिमत्व माझ्यापूढे उलगडत गेलं. त्या देशविदेशात फिरल्याने त्यांनी पेहरावाचे सर्व प्रकार घालून पाहिले होते. त्या हायहिल्स वापरतं. मेकअपही करत. सोंदर्यदृष्टी त्यांच्याकडे होती. या सगळ्यागोष्टीं ही भूमिका साकारताना मी लक्षात ठेवल्यात.”
इंदिरा गांधींच्या व्यकिमत्वाविषयीची उत्सुकता आजही लोकांच्या मनात किती आहे, याचा सुप्रियाला या नाटकाची जाहिरात होत असताना अनुभव आला, त्याविषयी बोलताना ती सांगते, ”जाहिरातीमध्ये हाफस्लिव्ह्ज ब्लाऊजमधली इंदिरा दिसल्यावर अनेक लोकांनी प्रतिक्रिया देताना आवर्जून त्या थ्रीफोर्थ ब्लाऊज घालत असल्याची आठवण करून दिली. खरं तर इंदिराजी सर्व प्रकारचे फॅशनेबल ब्लाऊज आणि साड्या घालायच्या. पण त्यांची खादीच्या साड्या आणि थ्रीफोर्थ ब्लाऊजची प्रतिमा कशी लोकांच्या मनात ताजी आहे. आणि ते या नाटकाविषयी जाणून घ्यायला किती उत्सुक आहेत, त्याचचं हे उदाहरण होतं.”
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, नाटकात राजीव गांधी आणि संजय गांधी या भूमिका वठवणा-या कलाकारांविषयी...
(सर्व छायाचित्रे - अजित रेडेकर)