आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्या, स्वानंदी, तेजस्विनी... ही आहे अभिनय क्षेत्रात पदार्पण करणा-या मराठी सेलेब्सची नवी पिढी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटोः डावीकडून - सत्या मांजरेकर, स्वानंदी टीकेकर, तेजस्विनी पंडीत आणि श्रिया पिळगांवकर - Divya Marathi
फोटोः डावीकडून - सत्या मांजरेकर, स्वानंदी टीकेकर, तेजस्विनी पंडीत आणि श्रिया पिळगांवकर
बॉलिवूडमध्ये आपल्या आईवडिलांचा अभिनयाचा वारसा पुढे चालवण्याचा ट्रेंड तसा जुनाच. येथे अनेक सेलिब्रिटी किड्सनी आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेसृष्टीत पदार्पण केले. आता हाच ट्रेंड हळूहळू मराठी सिनेसृष्टीतही दिसून येतोय. काही दिवसांपूर्वीच अभिनेते सचिन पिळगावकर यांची कन्या श्रिया पिळगावकर हिने 'एकुलती एक' या सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.
नुकत्याच रिलीज झालेल्या जाणीवा या सिनेमातून प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता महेश मांजरेकरांचा मुलगा सत्या मांजरेकर लीड हीरोच्या रुपात पडद्यावर झळकला. तसे पाहता सत्याचा हा दुसरा सिनेमा. गेल्यावर्षी मनवा नाईक दिग्दर्शित पोरबाजार या सिनेमातही तो झळकला होता.
श्रिया पिळगावकर, सत्या मांजरेकर यांच्याप्रमाणेच मराठी इंडस्ट्रीतील अनेक स्टार किड्सनी आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.
आज या रिपोर्टमधून आम्ही तुम्हाला अभिनय क्षेत्रात पदार्पण करणा-या मराठी स्टार किड्सची ओळख करुन देत आहोत. चला तर मग भेटुयात या अभिनय क्षेत्रातील या नव्या पिढीला...