आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: स्वप्नील जोशीची लाडकी लेक \'मायरा\'सह भेटा मराठी इंडस्ट्रीतील 27 सेलेब्सच्या मुलांना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरात 23 मे रोजी चिमुकल्या परीचे आगमन झाले आहे. स्वप्नील आणि त्याची पत्नी लीना यांनी नुकतेच आपल्या लाडक्या लेकीचे बारसे केले असून ''मायरा'' असे तिचे नाव ठेवले आहे. कवीची कल्पना, विलक्षण, कौतुकास पात्र असा मायराचा अर्थ होतो. ''वडील होणे ही भावना किती सुंदर असते असे मी अनेकांकडून ऐकले होते. पण, आज खर्‍या अर्थाने मी हे अनुभवत आहे. आम्हाला मुलगीच व्हावी अशी आम्ही दोघेही प्रार्थना करत होतो. माझी मुलगी जन्मली त्या क्षणी मला झालेला आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. 'मुलीचा बाबा' होण्याची भावनाच वेगळी असते'', असे स्वप्नील म्हणतो.
स्वप्नीलने माहिराचा एक फोटो आपल्या सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर केला आहे. खरं तर मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांना आपण ओळखतो. मात्र फार थोड्या जणांनी या कलाकारांच्या मुलामुलींना पाहिले आहे. एखाद दुस-या कार्यक्रमात हे मराठी कलाकार आपल्या मुलांबरोबर दिसतात.
चला तर मग स्वप्नील जोशीच्या लेकीसोबतच भेटा सुबोध भावे, लक्ष्मीकांत बेर्डे, आदेश बांदेकर, रवी जाधव, गिरीजो ओक, कुशल बद्रिके, अतुल परचुरे, प्रियदर्शन जाधव, भारत गणेशपुरे, भरत जाधव, रेणुका शहाणेसह मराठीतील नावाजलेल्या सेलिब्रिटींच्या मुला-मुलींना...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...