आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री रंजना भाची तर सिद्धार्थ होता व्ही. शांताराम यांचा नातू, भेटा कुटुंबातील सदस्यांना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः चित्रतपस्वी व्ही. शांताराम यांचा आज 116 वी जयंती आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर एक परिपूर्ण दिग्दर्शक अशी व्ही. शांताराम यांची ख्याती आहे. ते एक उत्कृष्ट अभिनेते, कल्पक संकलक, वेगळी दृष्टी असलेले दिग्दर्शक आणि निर्माते होते. अनेक गुणवैशिष्ट्ये असलेल्या व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शनची एक नवीन पद्धत रूढ केली. सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्नांचे तरंग त्यांच्या चित्रपटांमध्ये उमटले होते. 1930 च्या दशकातील मूक चित्रपटांपासून ते 1980 च्या दशकामधील डिजिटल चित्रपटांच्या युगाचे ते साक्षीदार होते. शांताराम राजाराम वणकुद्रे हे त्यांचे संपूर्ण नाव होते. व्ही. शांताराम आधी प्रभात फिल्म कंपनीत होते. मात्र त्यानंतर त्यांनी राजकमल कलामंदिर ही स्वत:ची चित्रपट निर्माती कंपनी काढली होती.  


अभिनेत्री संध्या होत्या तिस-या पत्नी... 
'पिंजरा' या गाजलेल्या या सिनेमात नर्तकी चंद्रकलाची व्यक्तिरेखा साकारणा-या अभिनेत्री संध्या या व्ही. शांताराम यांच्या तिस-या पत्नी आहेत. विशेष म्हणजे व्ही. शांताराम यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य हे सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. उदाहरणार्थ, मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रंजना या शांताराम यांच्या भाची होत्या. व्ही. शांताराम यांची नातवंडसुद्धा सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे. दिवंगत अभिनेता सिद्धार्थ रे हा शांताराम यांचा नातू होता. 


आज या रिपोर्टमधून आम्ही तुम्हाला व्ही. शांताराम यांच्या कुटुंबातील सदस्यांची ओळख करुन देत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि भेटा व्ही. शांताराम यांच्या कुटुंबीतील सदस्यांना...

बातम्या आणखी आहेत...