आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meghna Naidu Doing Item Number For Marathi Film 15 August Bhagile 26 January

EXCLUSIVE : मेघना नायडू म्हणतेय, \'मराठीतल्या आयटम गर्ल्सना मी धुळ चारायला आलीय\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री मेघना नायडू)
विद्या बालनने लाल साडीतला सिडक्टिव्ह डान्स नंबर हिट केल्यावर सनी लिओननेही आपल्या फिल्मसाठी सिडक्टिव्ह मुव्हज करताना लाल साडी नेसली आणि आता आयटम डान्ससाठी प्रसिध्द असलेली ‘कलियों का चमन’ म्युझिक व्हिडियो गर्ल मेघना नायडू आपलं मराठीतलं पहिलं आयटम साँग करतेय, तेव्हा तिनेही लाल साडीच नेसलेली दिसतेय. ‘१५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारी’ या चित्रपटासाठी ती मढमध्ये हा सिडक्टिव्ह डान्स करत होती. तसं पाहिला गेलं तर हिंदीतून जरी मेघनाने करियरची सुरूवात केली, तरी ती कन्नडा, तेलगू, तमिळ, मल्याळम अशाच चित्रपटांमध्ये जास्त दिसली.
आता साउथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीमधनं अचानक मराठीत कुठे आलीस असं विचारल्यावर ती म्हणते, “मी लहानपणापासून मुंबईतच राहते. साऊथमध्ये काम केलं तरी माझे आईवडील आणि मी मुंबईतच वास्तव्याला होतो. त्यामुळे मुंबईत राहून मराठी मला चांगलं बोलता येतं. मराठी फिल्मच्या ऑफर्स मला गेली ७ वर्ष येत होत्या. पण काही कारणाने ते झालं नाही. आणि ह्या चित्रपटात मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे, मी एका सिडक्टिव्ह गाण्यापुरती येत नाही. माझी यात भूमिकाही आहे. राजकारणावर भाष्य करणारी ही फिल्म आहे. राजकारणात काही इन्फ्युएन्शिअल बायकाही असतात. अशा अतिमहत्वाकांक्षी बायकांचं प्रतिनिधीत्व करणारी माझी भुमिका आहे आणि आत्ताचं हे सिडक्टिव्ह साँग मी अभिनेते असरानीजी, जे ह्यात एक राजकीय नेत्याच्या भूमिकेत आहेत. त्यांना सिड्युज करून त्यांच्याकडनं खूप मोठं घबाड मिळवण्यासाठी केलेला बनाव असतो, असा काहीसा सिक्वेन्स आहे.”
साउथमध्ये आयटम गर्ल म्हणून ओळख मिळाल्यावर मराठीत आलेली मेघना आता मराठीत करिअर करायच्या पूर्ण तयारीत असल्याचं तिच्या बोलण्यावरून जाणवतं. ”या फिल्ममुळे आता मला मराठीमध्येही सिनेमे करण्याचा कॉन्फिडन्स आला आहे आणि आता पहा, मराठीतल्या सर्व आयटम गर्ल्सला मी कशी धुळ चारेन ते. याला तुम्ही कदाचित ओव्हरकॉन्फिडन्स म्हणाल, पण मला गेल्या १५ वर्षांचा अनुभव आहे. मी डान्सच प्रशिक्षण घेतलंय. आणि फिल्म इंडस्ट्रीतल्या सगळ्या दिग्गज कोरीओग्राफरसोबत काम करून मी एकदम तयार झालीय. असा अनुभव प्रत्येकीच्याच गाठीला असतो, असं काही नाही.”
मेघनाच्या या सिडक्टिव्ह डान्सनंबरची कोरिओग्राफी करत असलेल्या गणेश आचार्यची आणि मेघनाची चांगली मैत्री आहे. ११ वर्षांपूर्वी मेघनाच्या एका फिल्मसाठी कोरिओग्राफी केलेल्या गणेशने सांगितले, “मी ११ वर्षांपूर्वी AK-47 चित्रपटासाठी कोरीओग्राफी केली होती. तेव्हा आम्ही एकत्र काम केलं होतं आणि आता पून्हा एकत्र काम करण्याची संधी मिळालीय. आणि मेघनाला जास्त शिकवावं लागतं नाहीये. ती पटकन सांगितलेल्या स्टेप्स करू शकत आहे.“
‘१५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारी’ या चित्रपटामध्ये ओम पुरी, किशोरी शहाणे, मेघना नायडू, मनोज जोशी, प्रेमा किरण, दिपाली सैय्यद आणि भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, मेघना आणि असरानी यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या आयटम साँगच्या ऑन लोकेशनची ही एक्सक्लूझिव्ह झलक...
(सर्व फोटो - अजित रेडेकर )