आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सजली स्वानंदी-संपदाच्या हातावर मेहंदी, मेहंदीच्यावेळी नाचताना स्वानंदी म्हणाली ललिताला ‘बुढियाँ’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वानंदीचं नीलशी आणि संपदाचं मेहशशी एकाच मांडवात लग्न होणार आहे. त्यामूळे आता देशपांडेंच्या घरचा उत्साह आणि आनंद दिव्गुणीतच होत चाललेत. त्यात देशपांडेंच्या घरी जहागिरदारांना आणि महेशला मेहंदीच्या कार्यक्रमात निमंत्रण दिलं गेलंय. त्यामूळे सर्व मंडळी आता मेहंदीच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. स्वानंदी, महेश आणि नील जरी खुशीत असले तरीही संपदा आणि ललिता मात्र ह्या सगळ्या कार्क्रमात नाखुशच दिसतायत.
नीलला ललिताबाईंच्या नाराजीबद्दल विचारल्यावर तो म्हणतो, “आईच्या पायाला लागलंय. त्यामूळे ती जरा शांत बसलीय इतकंच. पण ती नाराज असेल असं काही मला वाटतं नाही. स्वानंदी तिलाही आवडलीय. आणि आमच्या घरात कितीही मंडळी असली तरीही महत्वाच्या निर्णयांच्या आणि कार्यक्रमांच्या जबाबदा-या शेवटी माझ्या आईवरच येतात ना. त्यामूळे कदाचित ती जरा टेन्शनमध्ये असल्यासारखी वाटतेय. माझी मात्र आता हुरहूर वाढत चाललीय. कारण आता मला स्वानंदी लवकरात लवकर माझ्या घरी यायला हवीय.”
स्वानंदीच्या हातावर मेहंदी सजलीय. पण ऋतुजालाही कुठेतरी अवघडल्यासारखी झालं होतं. ऋतुजा म्हणते, “लग्नाच्या आदल्यादिवशी मेहंदी सजल्यावर जे काही मुलीला अवघडलेपण येतं. त्याची आज मला एक्टिंग करावी लागली नाहीये. कारण ह्या मेहंदीमूळे ते खरं खूरं अवघडलेपण माझ्या चेह-यावर दिसतंय. तरीही मेहंदी काढणा-याने माझ्या हातावर अर्ध्या तासात मेहंदी काढली होती. पण ती सांभाळण्यासाठी एक्टिंग करताना मला थोडी कसरत करावी लागतेय. पण स्वानंदीचा आज मजा करायचा दिवस आहे. आणि मी नाचलेली सुध्दा तुम्ही पाहणार आहात. नील आणि माझा रोमँटिक डान्स आहेच. पण त्यासोबतच मी चक्क ललिताबाईंसोबत नाचलेली दिसणार आहे. “
स्वानंदीने चांदनी चित्रपटातलं ‘मैं ससुराल नही जाऊँगी, डोली रख दो कहारों’ ह्या गाण्यावर डान्स केला. मुख्य म्हणजे ती नाचत असताना जेव्हा तिच्यासोबत नाचायला तिच्या बहिणी ललिताबाईंना घेऊन आल्या तेव्हा त्या तर नाचत नव्हत्याच. पण शांत उभ्या असलेल्या ललिताबाईंना ‘इस बुढियाँ को अब में सताउँगी’ असं म्हणत स्वानंदीने जो काही धक्का मारलाय. त्यावर चिडलेल्या ललिताबाईंचा चेहरा तर पाहण्यासारखा झाला होता.
(फोटो - स्वप्निल चव्हाण)
पुढील स्लाइडमध्ये वाचा , का चिडलीय संपदा आणि ललिताबाई