आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: दुबईत रंगला MICTA 2015चा शानदार सोहळा, रितेश देशमुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मिक्ता 2015च्या मुख्य सोहळ्यातील खास क्षणचित्रे)

आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी सिनेमा आणि नाट्यसृष्टीची कीर्ती पसरविणारा 'मराठी इंटरनॅशनल सिनेमा अॅण्ड थिएटर अवॉर्डस'चा यंदाचा सोहळा शुक्रवार म्हणजे 20 फेब्रुवारी रोजी दुबईत रंगला. अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या मुख्य संकल्पनेतून साकार झालेल्या या सोहळ्याचे यंदा पाचवे वर्ष आहे. पहिला 'मिक्ता' पुरस्कार वितरण सोहळा दुबई येथेच झाला होता. त्यानंतर लंडन, सिंगापूर, मकाऊ आणि आता पुन्हा दुबई येथे याचे आयोजन करण्यात आले आहे.
18 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी याकाळात मराठी इंडस्ट्री दुबईत मुक्कामाला आहेत. मुख्य पुरस्कार सोहळ्यापूर्वी मराठी सेलिब्रिटींचा क्रिकेट आणि व्हॉलिबॉलचा सामना रंगला. शिवाय सर्व मराठी कलाकारांनी फेरारीची सवारीसुद्धा केली.
शुक्रवारी रंगलेल्या मुख्य पुरस्कार वितरण सोहोळ्यात नृत्य, प्रहसन, गाणी यांची मैफल रंगली. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विशेष उपस्थिती होती. हा सोहळा सुरु होण्यापूर्वी अनेक कलाकारांना फोटो काढून घेण्याचा मोह आवरता आला नाही. या मुख्य सोहळ्यातील खास क्षणचित्रे divyamarathi.com आपल्या वाचकांसाठी घेऊन आले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा मराठी सेलिब्रिटींच्या मांदियाळी रंगलेल्या मिक्ता सोहळ्याची खास झलक...