आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी मिलींद सोमणची प्रेयसी होती ही सुपरमॉडेल, इटालियन बिझनसमनसोबत थाटला आहे संसार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नव्वदीच्या काळातील हॉट सुपरमॉडेल मधू सप्रे आठवतेय? एकेकाळी मिलींद सोमणची प्रेयसी असलेल्या मधूने मॉडेलिंग जगतात खळबळ उडवून दिली होती. निमित्त होते एका शूज जाहिरातीचे. या जाहिरातीत मिलींद आणि मधू यांनी पूर्णपणे नग्न अवस्थेत केवळ शूज आणि अंगावर अजगर घेऊन फोटोशूट केले होते. या एका फोटोशूटमुळे मधू चांगलीच अडकली होती आणि मुंबई पोलिसांनी या जाहिरातीविरुद्ध दोघांवर खटला दाखल केला. वाईल्डलाईफ प्रोटेक्शन अॅक्टनुसार, अजगराचा अवैध वापर करण्याचाही आरोप मधु, मिलींद आणि फोटोग्राफर्सवर ठेवण्यात आला. तब्बल 14 वर्षे हा खटला चालला.
 
मिलींदसोबत अनेक वर्षे रिलेशनशीपमध्ये होती मधू...
मिलींद आणि मधू यांनी त्यांच्या करीअरची सुरुवात जवळपास सोबतच केली होती आणि या दोघांचेही मॉडेलिंग इंडस्ट्रीत मोठे नाव होते. अनेक वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर या दोघांचे ब्रेकअपची त्यावेळी फार चर्चा झाली होती. मिलींद सोमणने त्यांच्या ब्रेकअपनंतर मधूविषयी काही गोष्टी सांगितल्या, तो म्हणाला की, मधू केवळ अशी एक मुलगी होती जिच्यासोबत मला लग्न करायचे होते. असे म्हणतात की, मधूसोबत ब्रेकअप झाल्यानंतरही मिलींद मधूच्या प्रेमात होता आणि त्याने तशी कबुलीही दिली होती. 
 
आता इटालियन बिझनेसमनसोबत फॅमिली लाईफ एन्जॉय करतेय मधू 
मिलंदसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मधूने इटालियन बिझनेसमनसोबत लग्न केले.  आता सध्या मधू इटलीतील रिक्कीओन याठिकाणी वास्तव्यास आहे. मधूच्या पतीचे नाव जिआन मारीया आहे. त्यांना एक मुलगीही आहे जिचे नाव मधूने इंदिरा असे ठेवले आहे. मधू अधूनमधून भारतभेटीवरही येत असते. 
 
पुढच्या स्लाईडवलर पाहा, मधूचे मॉडेलिंग काळातील तसेच पती-मुलीबरोबरचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...