आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day:या फ्रेंच अॅक्ट्रेससोबत गुपचूप विवाहबंधनात अडकला होता मिलींद सोमण, या कारणाने झाला घटस्फोट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मॉडेल आणि अभिनेता मिलींद सोमण आज त्याचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. एकेकाळचा सुपरमॉडेल असलेला मिलींद आजही तितकाच तरुण आणि फिट आहे. मिलींद सध्या फिटनेस प्रोमोटर म्हणूनही काम करत आहे. मिलींदचा जन्म 4 नोव्हेंबर 1965 रोजी स्कॉटलँड येथील ग्लासगो येथे झाला होता. वयाच्या सातव्या वर्षापर्यंत मिलींद स्कॉटलँड येथे राहिला. त्यानंतर 1972 साली त्याचे कुटुंब दादरला शिफ्ट झाले. मिलींदचे वडील न्युक्लीअर सायंटीस्ट तर आई बायोक्मिस्टची टीचर होती. 1995 साली मिलींदने मॉडेलिंगला सुरुवात केली आणि अगदी कमी वेळात तो लोकप्रिय ठरला. मिलींदच्या अफेअरच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. फ्रेंच अॅक्ट्रेसशी केला गुपचुप विवाह..
 
मिलींद सोमणचे नाव तसे पाहिले तर अनेक अभिनेत्रींशी जुळले. पण अचानक 2006 साली मिलींदने फ्रेंच अभिनेत्री मायलीन जॅम्पोनाईसोबत लग्न करु सर्वांना आष्चर्याचा धक्का दिला. 2004 साली मिलींद आणि मायलीन व्हॅली ऑफ फ्लॉवर्सच्या चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. 2 वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. 2006 साली दोघांनी गोव्यात गुपचुपपणे विवाह केला. एका मुलाखतीत मिलींदने सांगितले होते की, माईलीसोबतचे दिवस त्याच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होते. 
 
या कारणाने झाला घटस्फोट..
माईली फ्रेंच अभिनेत्री होती. मिलींदशई लग्न झाल्यानंतर माईली पॅरीसला निघून गेली आणि कामात व्यस्त झाली. इकडे मिलींदही त्याच्या कामाला लागला. दोघे एकमेकांना फार वेळ देईनासे झाले. विवाहीत जोडप्याप्रमाणे ते एकमेकांना वेळ देऊ शकले नाही आणि त्यामुळेच दूर राहण्याने हळूहळू त्यांच्या नात्यात कटुता येण्यास सुरुवात झाली. अखेर 2009 साली या दोघांनी घटस्फोट घेतला आणि एकमेकांपासून कायमचे वेगळे झाले. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, मिलींद आणि माईलीचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...