आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ही माजी ‘मिस अर्थ इंडिया’ आहे मुळची कोल्हापूरची, आता करणार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण !

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - मुळची कोल्हापूरची असलेली हेमल इंगळेने नुकताच ‘मिस अर्थ इंडिया’चा बहुमान मिळवला आहे. तसे पाहिले तर मानुषी छिल्लरने 'मिस वर्ल्ड'चा किताब भारताकडे परत आणल्यानंतर सर्वत्र तिचा बोलबाला होताना दिसत आहे. सौंदर्यस्पर्धा जिंकल्यानंतर तरुणींचा पहिला ओढा असतो तो बॉलिवूड. पण 'मिस अर्थ इंडिया' हेमल इंगळेने हिंदी नव्हे तर मराठी चित्रपट सृष्टीतून करीअरची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी चित्रपट 'आस' मधून हेमल इंगळे झळकणार आहे. 
 
मिस अर्थ वर्ल्ड या स्पर्धेत भारतातून 35 मुलींची निवड झाली होती. त्यानंतर हेमलने अमेरिकेत होणाऱ्या ‘मिस अर्थ वर्ल्ड’या सौंदर्यस्पर्धेत भाग घेतला होता. तिथे तिने मिस अर्थ इंडिया हा किताब मिळवला. आता दिग्दर्शक मनोज विशे यांच्या 'आस' या चित्रपटातून हेमल मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मिस अर्थ इंडिया हेमल इंगळेचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...