आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरनेट क्वीन मिथिलाला बॉलिवूड ब्रेक, इरफान आणि मल्याळम स्टारबरोबर करणार डेब्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - मुरांबा चित्रपटातून मराठी चाहत्यांच्या मनाचा ठाव घेणारी अॅक्ट्रेस आणि इंटरनेट क्वीन मिथिला पालकर लवकरच आपल्याला इरफान खानबोरबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. मिथिला मल्याळम सुपरस्टार डलकेर सलमानबरोबर डेब्यू करणार असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र अद्याप चित्रपटाचे नाव निश्चित झालेले नसल्याचे, एका दैनिकाने दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. रॉनी स्क्रूवाला यांची निर्मिती असेल, अशी माहिती मिळत आहे. 

असा असेल चित्रपट..
- मिथिलाचा हा चित्रपट विनोदी असणार असून यात सलमान आणि इरफान हे मित्र असणार आहेत. 
- हे दोघे मित्र एका प्रवासावर निघतात आणि त्यानंतरच्या घडामोडी चित्रपटात असतील. 
- या महिन्याच्या म्हणजे ऑगस्टच्या अखेरीस केरळमध्ये चित्रपटाचे शुटिंग सुरू होणार असल्याची माहितीही मिळत आहे. 
- 'ये जवानी है दिवानी' आणि 'टू स्टेट्स' सारखे चित्रपट लिहिणारे लेखक हुसेन दलाल यांनी हा चित्रपट लिहिला आहे. 
- आकाश खुराना चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, तर अभिषेक असता मिथिलाचा हिरो...
 
 
बातम्या आणखी आहेत...