आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Film Mitwa Trailor Launch Held In Mumbai

सोनाली-स्वप्नील-प्रार्थना स्टारर \'मितवा\'च्या Trailer लाँचला सेलेब्सची मांदियाळी, पाहा Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून, दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी​सोबत स्वप्नील जोशी, अली असगर, सई ताम्हणकर आणि अतुल कुलकर्णी )
अभिनेता स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे हे त्रिकुट लवकरच 'मितवा' या आगामी सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा अलीकडेच मुंबईतील सांताक्रूज येथील लाइट बॉक्समध्ये पार पडला. यावेळी मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
अभिनेता अतुल कुलकर्णी, सई ताम्हणकर, तुषार दळवी, गायक-संगीतकार शंकर महादेवन, दिग्दर्शक संजय जाधव, संगीतकार अमित राज, अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, सचित पाटीलसह बरेच सेलेब्स यावेळी दिसले.
‘रामानंद सागर प्रॉडक्शन’चा वारसा लाभलेल्या ‘मिनाक्षी सागर प्रॉडक्शन’ने आगामी ‘मितवा’ सिनेमाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. रामानंद सागर यांची नात, मोती सागर यांची मुलगी असलेल्या मिनाक्षी सागर यांनी याआधी अनेक हिंदी मालिकांचे लेखन केले असून प्रथमच त्या ‘मिनाक्षी सागर प्रॉडक्शन’ निर्मिती संस्थेव्दारे मराठी चित्रपटाची निर्मिती करताहेत. ‘व्हिडिओ पॅलेस’ची प्रस्तुती असलेल्या ‘मितवा’ सिनेमा अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णा यांच्या भूमिका असून दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी या महत्त्वाकांक्षी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
या सिनेमाचे वेगळेपण म्हणजे 9 एक्स झक्कास वाहिनीवर झालेल्या लक्स झक्कास हिरॉईन टॅलेण्ट हंटचा किताब पटकावणा-याप्रार्थना बेहरेला यात अभिनेत्री म्हणून झळकण्याची संधी मिळाली आहे. ‘मितवा’ ही म्युझिकल लव्हस्टोरी असून या चित्रपटाला शंकर, एहसान, लॉय या प्रतिभावान संगीतकारांचे संगीत लाभले आहे. सोबत मराठीतील सध्याचे आघाडीचे संगीतकार निलेश मोहरीर, अमित राज, पंकज पडघन यांनीही सिनेमासाठी संगीत दिले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'मितवा'चा ट्रेलर आणि ट्रेलर लाँचला हजेरी लावलेल्या सेलिब्रिटींची छायाचित्रे..