आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modak And Payasam And Digital Detox For Chinmay Udgirkar\'s Bappa

Celebrity Ganesha: चिन्मयच्या बाप्पाला मोदकांसोबत पायसमचा नैवेद्य आणि Digital Detox

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘नांदा सौख्य भरे’ मालिकेमध्ये सध्या नील आणि स्वानंदीच्या साखरपुड्याची तयारी सुरू झालीय. जहांगिरदारांचा नील जरी आईच्या बडेजावात दबून गेलेला आहे. मात्र उदगीरकरांचा चिन्मय त्याच्या आईचा हातचं गणपतीच्या नैवेद्याचे भरपेट स्वादिष्ट जेवण जेवून गणेशोत्सवाची सुट्टी संपवून नुकताच नाशिकवरून परतलाय.
चिन्मय उदगीरकरच्या घरी नाशिकला तीन दिवस गणपती उत्सव साजरा केला जातो. त्याच्या घरी शाडू मातीचा गणपती येतो. तो म्हणतो, “ पूर्वी गणेशोत्सव हा घरातली मरगळ जाऊन मांगल्य घरी यावे, ह्यासाठी भक्तीभावाने साजरा करायचा सण होता. पण आजकाल ग्लोबलायझेशनच्या काळात तो स्वत:च्याच घरातल्यांना एकत्र आणण्याचा सण झालाय. आई-वडिल नाशिकमध्ये, मी मुंबईमध्ये आणि माझा भाऊ पूण्यामध्ये असं झालंय. पण घरच्या गणपतीमूळे आम्ही सगळे एकत्र घरी येतो. त्यावेळी म्हणूनच आपापले मोबाईल आणि गॅझेट्स बाजूला ठेवून फक्त एकमेकांसाठी वेळ देतो. माझे नातेवाईक आणि माझ्या मित्रांनाही मी त्यावेळेस आवर्जून घरी यायला सांगतो.”
चिन्मय सांगतो, “ आमच्या घरी गणपती आणि गौरी एकमेकांना पाहत नाहीत. त्यामूळे तीन दिवसांनी गणपतीचे विसर्जन होते. आणि गौरी घरात येते.”
चिन्मयच्या घरच्या नैवेद्याचे वैशिष्ठ्य म्हणजे त्यांच्या घरी मराठी पदार्थांसोबतच केरळी स्टाइलच्या दाक्षिणात्य पदार्थांचाही नैवेद्य दाखवला जातो. चिन्मय सांगतो, “ माझी आई केरळी आहे. पण लग्नानंततर तिने आमच्या घरातची महाराष्ट्रीयन पदार्थ करण्याची पध्दत शिकून घेतली. आणि आता तिच्या नैवेद्यात माहेर आणि सासरच्या पध्दतींचा मिलाफ पाहायला मिळतो. गणपतीच्यावेळी मोदक आणि सोबत खोब-याच्या पायसमचा नैवेद्य असतो. तर गौरीच्यावेळी पायसम आणि पुरणपोळी खायला मिळते. पूरी-भाजी प्रमाणेच नीर डोसाचाही नैवेद्य दाखवला जातो. आणि हे माझ्या सगळ्या मित्रांना माहित असल्याने झाडून सारे मित्र त्यावेळी जेवायला येतात.”
(प्रदिप चव्हाण)
पुढील स्लाइडमध्ये वाचा, चिन्मय उदगीरकर सांगतोय, नाशिककरांसाठी तो काय वेगळं करतोय.