आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Model Mrinmai Kolwalkar Is The New Fresh Face Of Marathi Film Industry

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकेकाळी राहुल महाजनची \'दुल्हनिया\' होण्याचे स्वप्न पाहणा-या या तरुणीची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः मृण्मयी कोलवालकर)
'गोल्ड कॉईन एन्टरटेन्मेंट'च्या आलोक श्रीवास्तवा यांची निर्मिती असलेला आणि यु. के. फिल्म्सच्या रेहबर खान यांची प्रस्तुती असलेल्या 'मिस मॅच' सिनेमात मृण्मयी कोलवालकर हा नवा चेहरा आपल्या भेटीस येणार आहे. 'मिस मॅच' हा तिचा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमात अभिनेता भूषण प्रधान आणि मृण्मयी कोलवालकर ही फ्रेश जोडी आपल्या भेटीला येणार असून
या सिनेमाचे दिग्दर्शन गिरीश वसईकर यांनी केले आहे.
कोण आहे मृण्मयी कोलवालकर?
मृण्मयी मुळची पुण्याची असून तिने आर्ट्स या विषयात पदवी प्राप्त केली आहे. एनडीटीव्ही वाहिनीवरील 'राहुल दुल्हनिया ले जायेगा' या रिअॅलिटी शोमध्ये मृण्मयी सहभागी झाली होती. या शोमुळे ती पहिल्यांदा प्रकाशझोतात आली होती. मृण्मयीने लॉरेल, गार्डन सारीज, दिनेश सुटिंगस यासाठी मॉडेल म्हणूनदेखील काम केले आहे.
'मिस मॅच' सिनेमाची स्टोरीलाइन...
'मिस मॅच' या सिनेमाच्या टायटलवरूनच आपल्याला हा सिनेमा प्रेम, लग्न या विषयावर भाष्य करणारा असल्याचे समजते. ही कथा आहे एका श्रीमंत घराण्यातील बिझनेसमनच्या मुलीची. आपल्या मुलीचे लग्न हे आपल्या पसंतीच्या तसेच श्रीमंत घराण्यातील अशा मुलाशी व्हावे अशी वडिलांची इच्छा असते. परंतु अरेंज मॅरेज वर आपला विश्वास नसल्याने आपण स्वतःच आपल्या पसंतीचा मुलगा शोधणार आणि त्याच्याशीच लग्न करणार असा हट्ट त्याच्या असतो. यासाठी ती मुलगी वडिलांकडून दोन वर्षांचा कालावधी घेते. या दोन वर्षांत तिला तिच्या पसंतीचा नवरा मिळतो का? की ती अरेंज मॅरेज करते? या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 'मिस मॅच' हा सिनेमा पाहावा लागणार आहे.
अभिनेता भूषण प्रधान, मृण्मयी कोलवालकर यांच्यासोबत उदय टिकेकर, भाऊ कदम, जयवंत भालेकर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आपल्याला पहायला मिळणार आहेत. येत्या नोव्हेंबर महिन्यात 'मिस मॅच' सिनेमा आपल्या भेटीस येणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा मराठी सिनेसृष्टीतील नवीन ग्लॅमरस चेहरा अर्थातच मृण्मयी कोलवालकर हिची खास छायाचित्रे...
(ही सर्व छायाचित्रे मृण्मयीच्या फेसबुक अकाऊंटवरुन घेण्यात आली आहेत.)