आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बी, कमल हासन यांचं अनुकरण करतोय कोणता मराठी अभिनेता? जाणून घ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चन आणि कमल हसन 'प्रॉस्थेटिक मेकअप' करून
शहनशाह अमिताभ बच्चन यांनी ‘पा’ चित्रपटाच्या भूमिकेसाठी प्रॉस्थेटिक मेकअप केला होता. आणि ते ‘ऑरो’ बनले होते. तर साऊथ सुपरस्टार कमला हसन यांनी‘चाची 420’, ‘दशावतारम’,’विश्वरूपम’ या चित्रपटांसाठी प्रॉस्थेटिक मेकअपचा आधार घेतला होता. आणि आता मराठी स्टार मोहन जोशी यांनी सुध्दा प्रॉस्थेटिक मेकअपचा वापर करून स्वामी समर्थांची भूमिका आपल्या आगामी ‘देऊळबंद’ या चित्रपटात साकारली आहे.
स्वामी समर्थ बनलेल्या मोहन जोशी यांनी त्या अनुभवाबद्दल सांगितलं, “स्वामी समर्थांना आपण नेहमीच फोटोमधून पाहिलंय. कोणीही त्यांना प्रत्यक्षात पाहिले नाही. आणि ही फिल्म काही त्यांच्या जीवनावर नाही. आजच्या काळातली फिल्म आहे. आणि त्यात नायकाला भेटणारे स्वामी समर्थ असा रोल आहे. त्यामुळे मला स्वामी समर्थांसारखं दिसायचं होतं. ते काम दिग्दर्शक प्रवीण तारडे आणि मेकअप आर्टिस्ट महेश बराटे यांनी चांगल्या पध्दतीने केलंय, असचं मी म्हणेन. स्वामींना कोणी बोलताना ऐकलं नाहीय. त्यामुळे मला आवाजासाठी काही वेगळं करायचं नव्हतं. फक्त आपल्या संयत अभिनयाच्या जोरावर स्वामींची भूमिका सिल्व्हर स्क्रिनवर साकारायची होती.”
स्वामी समर्थांच्या भूमिकेत असताना त्यांचा कॉस्च्युम होता एक भगवा लंगोट आणि एक शाल. त्याविषयी मोहन जोशी सांगतात, “मला फक्त लंगोट घालून पूर्णवेळ सेटवर राहायचे होते. पहिल्यांदा मला खूप लाजल्यासारखे झाले. पण तर सेटवर येणा-या स्वामी भक्तांना किंवा सेटवरील क्रु मेंबर्सना मला पाहून कधीच ऑकवर्ड वाटले नाही. हे पाहून मी ही जरा मोकळा झालो. “
आपल्या प्रॉस्थेटिक मेकअपविषयी ते सांगतात,”फिल्म सुरू होण्याअगोदर आम्ही लूक टेस्टसाठी 6-7 मिटींग केल्या. आणि माझा लूक निश्चित केला. त्यानंतर रोज जवळ जवळ तीन तास मला मेकअपला लागायचे. स्वामी समर्थांचे वैशिष्ठ्य असणारे मोठे कान, त्यांच्यासारखे जाड नाक आणि त्यांच्यासारखे मोठे ओठ हे मला लावण्यासाठी प्रॉस्थेटिक्सचा आधार घ्यावा लागायचा. आणि हा प्रॉस्थेटिक मेकअप खूपच त्रास दायक होता. पांढ-या रंगाच्या गोंद माझ्या काना, नाकावर आणि ओठांवर लावल्यावर मग ते निर्माण केलेले साचे माझ्या कानावर, नाकांवर आणि ओठांवर लावतं. आणि मग त्यासह मला रोज दिवसाचे आठ ते दहा तास काम करावे लागे. दिवसभर त्या मेकअपसह सेटवर फिरताना कधी घाम येई मग तर तो मेकअप अधिकच टोचू लागे. बरं, तो मेकअप काढल्यावर कान चिकट राहतात. एकदा तर चक्क सकाळी झोपेतनं उठल्यावर कानाला उशीच चिकटून राहिली होती.”
अमिताभ बच्चन यांनी जेव्हा पा फिल्म केली होती, तेव्हा प्रॉस्थेटिक मेकअप करायला त्य़ांना चार तास लागायचे. आणि दर दोन ते तीन दिवसांनी त्यांना एक दिवस त्या प्रॉस्थेटिक मेकअपमुळे चेह-याची हानी होऊ नये म्हणून सक्तीची विश्रांती घ्यावी लागे. पण मोहन जोशींचा अनुभव वेगळा होता. ते म्हणतात, “ मी एकही दिवस विश्रांती न घेता पूर्ण शुट केले आहे. आणि अगदी रात्रीचेही काही सीन होते. त्यासाठीही शुट केले आहे.”
मोहन जोशी, गश्मीर महाजनी स्टारर देऊळबंद हा सिनेमा 31 जुलैला रिलीज होतो आहे.
पूढील स्लाइडवर पाहा, देऊळबंदमधला मोहन जोशींचे स्वामी समर्थांच्या भूमिकेतले फोटो