आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी इंडस्ट्रीत झाली या नवीन चेह-याची एन्ट्री, फिल्म रिलीजपूर्वीच येऊ लागल्या लग्नाच्या मागण्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमात चमकून एका रात्रीच स्टार झालेले अनेक कलावंत आपल्याला पाहायला मिळतील. हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अनेक नवोदित कलाकारांना हे स्टारडम नवखे नाही. मात्र, मराठीत असे क्वचितच घडते. पांडुरंग जाधव दिग्दर्शित 'ड्राय डे' या आगामी सिनेमातील मोनालिसा बागल या नवोदित अभिनेत्रीसोबत असेच काहीसे घडत आहे.  
 
पांडुरंग जाधव दिग्दर्शित आणि लिखित हा सिनेमा अजून प्रदर्शित झाला नाही, त्याआधीच मोनालिसाच्या चाहता वर्गात प्रचंड वाढ होताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे या सिनेमामुळे तिला अनेक चाहत्यांकडून लग्नाची मागणी देखील घातली जात आहे. तिच्या सोशल नेट्वर्किंग साईटवर आणि मोबाईलवर विवाहोत्सुक तरुणांचे अनेक मेसेजेस आपल्याला पाहायला मिळतील. 
 
आनंद सागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि संजय पाटील यांची निमिती असलेला हा सिनेमा येत्या नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. नुकतेच या सिनेमाचे 'अशी कशी' आणि 'दारू डिंग डांग' हे गाणे प्रदर्शित झाले आहेत. या दोन्ही गाण्यातील मोनालिसाचे सौदर्य तिच्या चाहत्यांना घायाळ करून सोडत आहे. शिवाय या सिनेमात ऋत्विक केंद्रेची देखील प्रमुख भूमिका असणार आहे. 

तरुणाईवर आधारीत असलेल्या या सिनेमाची नितीन दीक्षित यांनी पटकथा व संवाद लिहिले आहेत. डीओपी नागराज दिवाकर यांच्या कॅमेऱ्यात चित्रित झालेल्या या सिनेमाचे संकलन अमित कुमार यांनी केले आहे. ऋत्विक - मोनालिसा या जोडीबरोबरच कैलाश वाघमारे, योगेश माधव सोहनी, पार्थ घाडगे, चिन्मय कांबळी, आयली घिए, अरुण नलावडे आणि जयराम नायर हे कलाकारदेखील आपल्याला पहायला मिळणार आहेत.

पाहुयात, मराठी इंडस्ट्रीतील या नवोदित अभिनेत्रीची खास छायाचित्रे... 
बातम्या आणखी आहेत...