Home »Bollywood »Marathi Cinekatta» Movie Review Mativarala Budha

Movie Review : निसर्गात रमलेल्या माणसाची धड सांगता न आलेली गोष्ट

समीर परांजपे | Jun 19, 2017, 17:56 PM IST

चित्रपट - माचीवरला बुधा
रेटिंग - २ स्टार
कलावंत - सुहास पळशीकर, स्मिता गोंदकर, भगवान पाचोरे, नितीन कुलकर्णी, बालकलाकार कृष्णादत्त
निर्माता - विजयदत्त फिल्म्स
दिग्दर्शक - विजयदत्त
संगीत - धनंजय धुमाळ
कथा - गो. नी. दांडेकर
पटकथा - संवाद - प्रताप गंगावणे
श्रेणी - ड्रामा
प्रख्यात लेखक व दुर्गअभ्यासक गो. नी. दांडेकर यांनी 'माचीवरला बुधा' ही कादंबरी लिहून साठ वर्षे लोटली पण त्या कादंबरीवर आजवर मराठी चित्रपट बनविण्यात आला नव्हता. अखेर हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले असून `माचीवरला बुधा' याच शीर्षकाने हा चित्रपट बनविण्यात आला आहे. एखाद्या गाजलेल्या कादंबरीवर मराठी चित्रपट बनविण्याचे प्रसंग तसे दुर्मिळच असतात. त्यामुळे माचीवरला बुधा या चित्रपटाकडे लक्ष लागून राहिलेले होते. गो. नी. दांडेकरांनी ज्याच्यावर कादंबरी लिहिली तो बुधा खरोखरच अस्तित्वात होता. पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरात श्रीवर्धन-मनरंजन हे ऐतिहासिक किल्ले आहेत. त्यांच्या सान्निध्यातील गावात बुधा अनेक वर्षे राहात होता. तेथील निसर्ग, पशुपक्षी यांच्यात तो रममाण झाला होता. या बुधाला पक्षीतज्ज्ञ मारुतीराव चितमपल्ली हेही भेटले होते. या सगळ्या गोष्टींमुळे गो. नी. दांडेकरांच्या कादंबरीवरील हा चित्रपट कसा असेल याचे औत्सुक्य असणे साहजिकच होते.
पुढे वाचा, काय आहे चित्रपटाची कथा आणि कसा आहे कलाकारांचा अभिनय, दिग्दर्शन, संगीत...

Next Article

Recommended