आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MOVIE REVIEW : वाचा अभिनेत्री अलका कुबल यांनी केलेले ‘अगं बाई अरेच्चा 2’चे समीक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री अलका कुबल यांनी फक्त divyamarathi.com च्या आग्रहाखातर ‘अगं बाई अरेच्चा 2’ या चित्रपटाचं केलेलं हे परिक्षण... (शब्दांकन – अनुजा कर्णिक)
चित्रपट - ****
गेले कित्येक दिवस टीव्ही आणि वेबसाईट्सवर ‘अगं बाई अरेच्चा 2’ चे प्रोमो पाहत होते. त्यामुळे या चित्रपटासाठी उत्सुकता ताणली गेली. अशाच वेळी केदार शिंदेचा चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी फोन आल्यावर नव्या पठडीतला स्त्री प्रधान सिनेमा पाहायला मिळणार या उत्सुकतेपोटी फिल्म पाहायला गेले. मी माझ्या चित्रपट कारकिर्दीत जवळ जवळ 12-15 वर्षे हिरोइन ओरिएन्टेड चित्रपट केल्याने त्या सिनेमाविषयी मला विशेष आकर्षण वाटत होतंच आणि कथानकाच्या प्रेमातच पडले. खरं तर शुभांगी कुडाळकरने ती प्रेमात पडल्यावर एखाद्या पुरूषाला हात लावणं आणि मग त्याच्यासोबत काही अपघात होणं हे कथानक अंधश्रध्देच्या वाटेने जात उपदेशाच्या कंटाळवाण्या प्रवासाकडे जाणारं आहे. पण कुठेही उपदेशाचे डोस न पाजता, एकही सीन अथवा डायलॉग अशा पध्दतीचा न टाकता हा चित्रपट मनोरंजक बनण्यात आलाय. आणि म्हणूनच चित्रपट मनाला भावतो. शुभांगी कुडाळकर या व्यक्तिरेखेत आपल्याला चार अभिनेत्री पाहायला मिळतात. आणि सोनालीसह गौरवी आणि सुरभी या दोघींनीही यात शुभांगी या व्यक्तिरेखेला न्याय दिलाय. क्लायमॅक्स ही एवढा सुरेख केलाय. की यापेक्षा जर काही दूसरा असता तर तो कंटाळवाणा झाला असता. त्यामुळे माझ्याकडनं चित्रपटाला 5 पैकी 4 स्टार्स
पुढील स्लाईडवर वाचा, सोनाली कुलकर्णीसह इतर कलाकारांचा अभिनय, केदार शिंदे यांचे दिग्दर्शन, दिलीप प्रभावळकर यांची कथा, संगीत याविषयी काय म्हणातयेत अलका कुबल...