आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MOVIE REVIEW : \'बंदूक्या\' - वंचित समाजातील वेदनांचे प्रत्ययकारी चित्रण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपट  बंदूक्या
रेटिंग 3 स्टार
कलावंत अतिषा नाईक, शशांक शेंडे, निलेश बोरसे, नामदेव मुरकुटे, अमोल बागुल, तन्मयी चव्हानके, वासंतिका वाळके
कथा/पटकथा/दिग्दर्शक राहुल मनोहर चौधरी
पटकथा/संवाद  नामदेव मुरकुटे
संगीत  परिक्षित भातखंडे
श्रेणी  फॅमिली ड्रामा
 
 
जातपंचायतीचे वर्चस्वामुळे विविध जातीजमातीतील सामान्य माणसांवर खूप अन्याय होत असतो. या अन्यायाविरोधात दाद मागण्याची हिंमत करणाऱ्याला मनमानेल ती शिक्षा जात पंचायत देते. देशाचा कायदा वगैरे त्यांच्या लेखी नसतो. जातपंचायतीच्या या भीषण वास्तवावर थेट भाष्य करणारे चित्रपट आजवर मराठीत फारसे आलेले नव्हते. ती उणीव 'बंदूक्या' या चित्रपटाने भरुन काढली आहे. रामनाथ चव्हाण यांच्या कथेवर हा चित्रपट आधारित आहे. 
 
हरयाणा, पंजाब यासारख्या राज्यांमध्ये खाप पंचायतींच्या जुलमी नियमांमुळे विशिष्ट जातीजमातीतील स्त्रीपुरुषांवर जो अन्याय होत होता त्याला वाचा फुटली होती. पण महाराष्ट्रात जातपंचायतींचे जे नियम आहेत, त्याचप्रमाणे विविध जातीजमाती, आदिवासींमधील प्रथा आहेत त्यांच्या खूप खोलवर अंतरंगात शिरुन या प्रथा, परंपरांचे चित्रण चित्रपटाच्या माध्यमातून करण्याचे काम मराठीत फारसे झाले नव्हते. 'बंदूक्या' या चित्रपटात नेमके हे चित्रण करण्यात आले आहे. केले आहे. 
 
जात पंचायतीला मूठमाती देण्यासाठी राज्य सरकारने संमत केलेल्या जात पंचायतविरोधी कायद्यावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली. त्यानंतर राज्यभरात हा कायदा लागू झाला. `महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण २०१६' असे कायद्याला नाव देण्यात आले. यातील दोषींना ३ वर्ष कारावासाची शिक्षा अथवा १ लाख रुपये दंड किवा दोन्ही शिक्षा भोगाव्या लागणार आहेत. या सगळ्या घटना घडत असताना दूसऱ्या बाजूला बंदूक्या या चित्रपटातून जातपंचायतींवर भाष्य करण्यात आले आहे हे या चित्रपटाचे वेगळेपण आहे.
 
पुढे वाचा, काय आहे बंदुक्याची कथा आणि यासह बरेच काही...
बातम्या आणखी आहेत...