आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review: \'थँक्यू विठ्ठला\' विठ्ठलाच्या नावावर खपवलेला अर्थहीन चित्रपट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपट थँक्यू विठ्ठला
रेटिंग दोन स्टार
कलाकार महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, मौसमी तोंडवळकर, स्मिता शेवाळे ओदक, पूर्वी भावे, दीपक शिर्के, कमलेश सावंत, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर, किशोर चौघुले, अभिजित चव्हाण, मिलिंद सफई, सतीश सलागरे, याकुब सईद, अरुण घाडीगावकर, शैलेश पितांबरे, रिचा सिन्हा, तेजा देवकर, बालकलाकार - वरद सरम्बेळकर
कथा व दिग्दर्शन देवेंद्र शिवाजी जाधव
पटकथा  एम. सलीम
संवाद एम.सलीम व योगेश शिरसाट
संगीत रोहन-रोहन
निर्माते   गोवर्धन नारायण काळे,  गौरव गोवर्धन काळे, अंजली सिंग
चित्रपट प्रकार  फॅमिला ड्रामा
 
पंढरपूरच्या विठ्ठलाला कथेत गुंफून तीन वर्षांपूर्वी झळकलेल्या व रितेश देशमुख नायकाच्या भूमिकेत असलेल्या लई भारी या चित्रपटाने तीन वर्षांपूर्वी उत्तम व्यवसाय केला होता. त्यानंतर विठ्ठलाच्या भक्तीचा संदर्भ घेऊन मराठी चित्रपट काढण्याचा प्रवाहच सुरु झाला तो यंदाच्या वर्षीही कायम आहे. यंदा विठ्ठला शपथ हा चित्रपट झळकला पण त्याला प्रेक्षकांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. विठ्ठल, थँक्यू विठ्ठला हे चित्रपटही त्याच पठडीतले. त्यापैकी थँक्यू विठ्ठला हा चित्रपट आता प्रदर्शित झाला आहे. एखादी गोष्ट लोकप्रिय झाली की त्याचेच अनुकरण केले जाते हे या विठ्ठलमहात्म्याच्या मराठी चित्रपटांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
 
थँक्यू विठ्ठला या सध्या चित्रीकरण सुरु असलेल्या नव्या मराठी चित्रपटातही विठ्ठलभक्तीचा संदर्भ आहेच. विठ्ठला शप्पथ या चित्रपट मात्र काही फारसा चालला नाही. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठूरायाची महती आजवर अनेक मराठी चित्रपटांतून दाखविण्यात आली आहे. असे असले तरीही प्रेक्षक नेहमीच सावळ्या विठुरायावर आधारित असणा-या चित्रपटांच्या प्रतीक्षेत असतात असा दावा विठ्ठला शप्पथ या चित्रपटाच्या कर्त्यांनी केला होता. पण चित्रपट एकुणच ढिसाळ असल्याने तो फारसा चालला नाही. किमान थँक्यू विठ्ठला हा विठ्ठल भक्तीशी नाळ जोडणारा हा मराठी चित्रपट तरी बरा असू दे असे साकडे ज्या मराठी प्रेक्षकांनी साक्षात विठ्ठलाला घातले असेल त्यांची निराशा होणार आहे. थँक्यू विठ्ठला हा चित्रपट अतिशय ढिसाळ बनविलेला आहे.
 
पुढे वाचा, काय आहे या चित्रपटाची कथा, कसा आहे महेश मांजरेकर आणि मकरंद अनासपुरे यांचा अभिनय आणि यासह बरंच काही..
 
बातम्या आणखी आहेत...