Home »Bollywood »Marathi Cinekatta» Movie Review Of Marathi Film TTMM

Movie Review : `तुझं तू माझं मी'च्या पलीकडचे सुंदर जग दाखविणारा युथफूल चित्रपट

समीर परांजपे | Jun 19, 2017, 18:02 PM IST

चित्रपट तुझं तू माझं मी
रेटिंग4 स्टार
कलावंतललित प्रभाकर, नेहा महाजन, विद्याधर जोशी, सविता प्रभुणे, सतीश पुळेकर, सीमा देशमुख, सागर कारंडे, पुष्कर लोणारकर, शर्वरी लोहकरे, भारत गणेशपुरे, श्रीराम पेंडसे,  चेतन चावडा, जयेश संघवी व पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत कादंबरी कदम
निर्मातावैशाली एन्टरटेनमेन्ट आणि इरॉस इंटरनॅशनल
दिग्दर्शककुलदीप जाधव
संगीत पंकज पडघन
कथा, पटकथा, संवादतेजपाल वाघ
श्रेणी लव्हस्टोरी
 
 
मराठीमध्ये युथफूल चित्रपट येऊ लागले आहेत. त्यातील 'चि. व चिं. सौ. का.' हा चित्रपट त्याच धर्तीचा होता. लग्न या विषयाभोवती धमाल कॉमेडी गुंफत तो बनविला गेला होता. त्याला प्रेक्षकांनी बऱ्यापैकी प्रतिसाद दिला. कॉलेजजीवन व प्रेम अशा दोन्ही ट्रॅकवर एकाच वेळी धावणाऱ्या 'एफ यू' या युथफूल चित्रपटाला पाश्चिमात्य वळणाची, संगीताची फोडणी खूप होती. पण तो चित्रपट फारसा नाही चालला. 'एफ यू' बरोबरच प्रदर्शित झालेल्या 'मुरांबा' या चित्रपटाचा प्रेमाबरोबरच नात्यांचीही गुंफण व त्याची परिपक्वता अलवारपणे उलगडून दाखविली होती. तो प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला.
 
याच युथफूल मराठी चित्रपटांच्या मालिकेतील पुढचा चित्रपट म्हणजे 'तुझं तू माझं मी'. या चित्रपटाचा प्रारंभही लग्न या विषयानेच होतो व तो संपतोही लग्न याच विषयाने. आजच्या युवा पिढीतील लोक लग्न, त्यांचे भावविश्व अशा सर्व गोष्टींबाबत कसा विचार करतात, त्यातून ते आपापले निर्णय कशापद्धतीने घेतात हे अत्यंत उत्तमप्रकारे या चित्रपटात उलगडून दाखविण्यात आले आहे. 'तुझं तू माझं मी' हा सर्वांगाने युथफूल चित्रपट आहे.
 
पुढे वाचा, काय आहे या चित्रपटाची कथा, कसा आहे कलाकारांचा अभिनय आणि दिग्दर्शन आणि संगीत... 

Next Article

Recommended