Home »Bollywood »Marathi Cinekatta» Movie Review Of Marathi Film Tula Kalanar Nahi

Movie Review : 'तुला कळणार नाही' कथेतील त्रुटींमुळे चित्रपटाचा उडाला बोजवारा

समीर परांजपे | Sep 08, 2017, 11:57 AM IST

चित्रपटतुला कळणार नाही
रेटिंग3 स्टार
कलावंतसुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, सुशांत शेलार, नीथा शेट्टी, जयवंत वाडकर, अनुराधा राजाध्यक्ष, उदय टिकेकर, रसिका सुनील, संग्राम साळवी
दिग्दर्शकस्वप्ना वाघमारे जोशी
कथासमीर अरोरा
पटकथाशिरीष लाटकर, समीर अरोरा
संवादशिरीष लाटकर
निर्मातानिलेश मोहरीर, अमितराज
श्रेणीफॅमिली ड्रामा
सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी चित्रपटांमध्ये साकारलेल्या नायकाचे बहुतेक वेळा विजय असे असायचे. विजय हे नाव अमिताभ बच्चन यांच्यासाठी भाग्याचे आहे असा बहुदा चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांचा समज असावा. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याने भूमिका केलेल्या चित्रपटांपैकी 15 चित्रपटांमध्ये त्याने साकारलेल्या नायकाचे नाव राहुल किंवा राज असे आहे. डर, जमाना दिवाना, यस बॉस, दिल तो पागल है, कुछ कुछ होता है, हर दिल जो प्यार करेगा, कभी खुशी कभी गम, चेन्नई एक्स्प्रेस, फॅन अशा बऱ्याच चित्रपटाने शाहरुखने साकारलेल्या नायकाचे नाव राहुल होते. त्यातील 'कुछ कुछ होता है' या चित्रपटाने शाहरुख खानने साकारलेल्या नायकाच्या राहुल या नावाला खरी प्रेक्षकमान्यता मिळवून दिली.
या चित्रपटात काजोलने अंजलीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या अखेर अनेक अडचणींवर मात करीत सरतेशेवटी राहुल व अंजली यांचे लग्न होते. 'कुछ कुछ होता है' मधील या राहुल व अंजलीने प्रेक्षकांच्या मनावर केलेले गारुड अजूनही उतरायला तयार नाही. नेमकी ही गोष्ट लक्षात घेऊन `तुला काही कळेना' या मराठी चित्रपटातील नायकाचे नाव राहुल व नायिकेचे नाव अंजली ठेवलेले आहे.
बॉलिवूडच्या प्रेमकथेतील सर्वात रोमँटिक कपल असणारे राहुल-अंजली हे पात्र मराठीत `तुला कळणार नाही' या चित्रपटाद्वारे येत असून त्यात या दोघांची लग्नानंतरची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे' असे या चित्रपटाची प्रदर्शनपूर्वप्रसिद्धी करताना प्रसिद्धीपत्रकांमध्ये म्हटले गेले होते. पण `तुला कळणार नाही' हा चित्रपट बघितल्यानंतर `कुछ कुछ होता है' मधील राहुल व अंजलीची आठवण होणे तर सोडाच पण या दोघांनी लग्न केल्यानंतर जो गोंधळ घातला आहे तो किमान मराठी चित्रपटातून तरी दाखवायला नको होता.
हिंदी चित्रपटातील संकल्पना उचलून त्याच्यावर मराठी कलम करण्याचे प्रकार काहीवेळा केले जातात. पण 'कुछ कुछ होता है'मधील राहुल व अंजलीला 'तुला कळणार नाही' या चित्रपटाद्वारे वेठीला धरले गेले नसते तर बरे झाले असते. 'कुछ कुछ होता है'च्या राहुल व अंजलीवरुन आमची पात्रे प्रेरित आहेत असे 'तुला कळणार नाही या चित्रपटाच्या प्रारंभी नामावलीत थेट कुठेही म्हटलेले नाही पण समझदार को इशारा काफी होता है.

Next Article

Recommended