आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Movie Review : 'विठ्ठला शप्पथ' - कल्पनाशून्यतेचा अजून एक अविष्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपट विठ्ठला शप्पथ
रेटिंग  एक स्टार
कलाकार  मंगेश देसाई, अनुराधा राज्याध्यक्ष, उदय सबनीस, विद्याधर जोशी, संजय खापरे, अंशुमन विचारे, विजय निकम, राजन ताम्हाणे, प्रणव रावराणे, राजेश भोसले, विजय साईराज, कृतिका गायकवाड
कथा, पटकथा, दिग्दर्शक चंद्रकांत पवार
संवाद   चंद्रकांत पवार, कौस्तुभ सावरकर, भानुदास पानमंद
संगीत चिनार-महेश
निर्माते गुरुदर्शन फिल्म्स आणि पहेल प्रोडक्शन एल.एल.पी
श्रेणी  फॅमिली ड्रामा
 
मराठी चित्रपटांमध्ये विविध प्रयोग होत आहेत हे जसे खरे आहे तसेच या क्षेत्रात वाईट दर्जाचे चित्रपटही तितकेच निर्माण होत आहे. किंबहुना वाईट दर्जाच्या मराठी चित्रपटांची संख्या चांगल्या मराठी चित्रपटांपेक्षा नक्कीच जास्त आहे. पुरेसे भांडवल हाती असले की चित्रपट निर्माण करण्यासाठी पुढे सरसावायला निघालेले लोक आपल्या हातात जी कथा आहे ती नेमकी कोणत्या दर्जाची आहे, त्यातून काही चांगला चित्रपट निर्माण होणार आहे का, याचा सारासार विचारही करीत नाही. होते काय की काही कोट्यवधी रुपये खर्चून एखादा मराठी चित्रपट तर तयार होतो, त्यातून कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक व इतर आघाड्यांवरील लोक यांना रोजगार मिळतो. पण अंतिमत: हा मराठी चित्रपट न चालल्याने त्यातील कलाकारांच्या कारकिर्दीत एका अपयशाची नोंद तर होतेच शिवाय निर्माता बुडित खात्यात जातो.
 
 काही हौशी निर्माते असतात ज्यांना चित्रपट चालला काय नाही चालला काय याने काहीच फरक पडत नाही, पण काही निर्माते असेही असतात त्यांना या क्षेत्रात काही वेगळे करायचे असते त्यांची पार दैना होते चित्रपटाच्या अपयशामुळे. सध्या जे मराठी चित्रपट येत आहेत त्यामध्ये सरधोपट पण नाही तर विषय आपटून आपटून धोपटलेल्या विषयांवरच बनविलेले चित्रपट येत आहेत त्यामध्ये विठ्ठला शप्पथ हा चित्रपट अग्रक्रमावर राहिल. या चित्रपटाला सुरुवात तर आहे पण कथा इतकी भरकटत जाते की काही म्हणजे काही कळत नाही. सगळे ढोबळ चित्रण...प्रेक्षकाकडे चित्रपट पाहाताना डोक्याला हात लावण्याशिवाय पर्याय उरत नाही.
 
पुढे वाचा, काय आहे चित्रपटाची कथा आणि यासह बरंच काही...
बातम्या आणखी आहेत...