आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘Mr & Mrs’ने गाठला 175 प्रयोगांचा टप्पा, नाटक पाहायला कलाकारांची मांदियाळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘मिस्टर अँड मिसेस’ या २१ डिसेंबर २०१३ला रंगभूमीवर आलेल्या नाटकाने नुकतेच १७५ प्रयोग पूर्ण केले. या निमित्ताने हे नाटक आवर्जुन पाहायला नाट्य-चित्रपटसृष्टीतले अनेक कलावंत उपस्थित होते.
‘मिस्टर अँड मिसेस’ नाटकात मुख्य भुमिकेत चिन्मय मांडलेकर आणि मधुरा वेलणकर-साटम आहे. तर या नाटकाचं दिग्दर्शन प्रियदर्शन जाधवने केले आहे. नाटकाची निर्मिती अभिजीत साटम, नरेंद्र चव्हाण, आणि रूजूता चव्हाणने केली आहे.
या सर्व कलावंतानी आपल्या सेलिब्रिटी मित्र-मैत्रिणींना या निमीत्ताने खास आमंत्रण दिलं होतं. नाटकाच्या प्रयोगादरम्यान एका छोटेखाणी पार्टीचंही आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये चिन्मयी सुमीत, सुमीत राघवन, कविता लाड, श्रेयस तळपदे, मृणाल कुलकर्णी, किशोरी शहाणे अशा आपल्या कलाकार मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत केक कापून या नाटकातल्या कलावंतानी सेलिब्रेशन केलं.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, सेलिब्रिटींनी आपल्या हस्ताक्षरात लिहीलेल्या प्रतिक्रिया आणि नाटकाला कोण-कोणात्या कलाकारांची उपस्थिती होती...तसेच केक कटींग सेरेमनीची खास छायाचित्रे...
सर्व फोटो- अजित रेडेकर
बातम्या आणखी आहेत...