आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day Spl: मृणालचे झाले आहे अरेंज मॅरेज, जाणून घ्या कशी अडकली लग्नाच्या बेडीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृणाल दुसानिस आणि नीरज मोरे... - Divya Marathi
मृणाल दुसानिस आणि नीरज मोरे...
एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल दुसानिस हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 28 वर्षे पूर्ण केली आहे. 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेतून आपल्या अभिनयाचा श्रीगणेशा करणारी मृणाल मुळची नाशिकची असून 20 जून 1988 रोजी तिचा जन्म झाला. नाशिकमध्येच ती लहानाची मोठी झाली. येथेच तिचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. मृणालने मास्टर ऑफ जर्नलिझममध्ये पदवी प्राप्त केल्याचे फार कमी जणांना ठाऊक असावे. छोट्या पडद्यावर ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तू तिथे मी’ या मृणालच्या मालिका प्रचंड गाजल्या होत्या. शिवाय ‘एकापेक्षा एक अप्सरा आली’मध्ये तिचा डान्सही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. मृणाल मोठ्या पडद्यावरही झळकली आहे. भरत जाधव स्टारर 'श्रीमंत दामोदर पंत' या सिनेमात ती झळकली होती.
मृणालसाठी यंदाचा वाढदिवस खूप खास आहे. त्याचे कारण म्हणजे ती लग्नानंतरचा आपला पहिला वाढदिवस साजरा करत आहे. याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात मृणाल लग्नाच्या बेडीत अडकली. अमेरिकास्थित नीरज मोरे याच्याशी 25 फेब्रुवारी मृणालचा विवाह झाला.
पुण्याची सून झाली मृणाल...
मुळचा पुण्याचा असलेला नीरज मोरे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मृणाल लॉस एजंलिस येथे महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमानिमित्त गेली असताना नीरज मोरेसोबत तिची ओळख झाली. त्यानंतर त्यांचा संवांद फोन आणि इंटरनेटच्या माध्यमातून वाढला. दोघांचे कुटुंबीय आणि विचारांची देवाण-घेवाण झाल्यावर लग्न ठरलं. मृणाल मूळची नाशिकची तर नीरज पुण्याचा आहे. पुण्यात दोघांच्या चहा पोह्यांचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर मी आणि तो फोनवर आणि ऑनलाईन बोलत होतो. काही दिवसानंतर मग आम्ही लग्नाचा निर्णय घेतला, असे मृणालने सांगितले होते.
आज मृणालच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला तिच्या लग्नाची खास छायाचित्रे दाखवत आहोत. अगदी मराठमोळ्या थाटात मृणाल लग्नगाठीत अडकली. तिच्या लग्नाला 'असं सासर सुरेख बाई' या मालिकेतील तिच्या सहकलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेता संतोष जुवेकरसह अनेक कलाकारांनी मृणालच्या लग्नात उपस्थिती लावली होती. यावेळी केवळ पुरुषच नव्हे तर सर्व महिलासुद्धा फेटा घालून दिसल्या होत्या.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, मृणाल आणि नीरजच्या लग्नाचा अल्बम....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...