आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृणाल दुसानिसमूळे मला आला कॉन्फिडन्स, सांगतेय तिची मैत्रीण तितीक्षा तावडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणत्याही दोन मालिकांमधल्या हिरोइन्सना एकत्र आलेलं पाहायला मालिकांच्या प्रेक्षकांना नेहमीच आवडतं. म्हणूनच तर मालिकांचे संगम आणि महासंगमचे खास एपिसोड्स आपल्याला टीव्हीवर पाहायला मिळतात.
‘असं सासर सुरेख बाई’ मालिकेत जुई आणि यशचा मच-अवेटेड लग्नसोहळा होता. ह्या दिमाखदार लग्नाला कलर्स मराठीच्या सर्वच मालिकांमधले कलाकार पाहायला मिळाले. ह्यावेळी सरस्वती म्हणजेच अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि जुई म्हणजेच अभिनेत्री मृणाल दुसानिसची खास बॉन्डिंग ऑफ-सेटही पाहता आली.
ह्या बॉन्डिंग विषयी अभिनेत्री तितीक्षा तावडे सांगते, “मृणाल आणि मी ह्याअगोदरही भेटलो होतो. ‘सरस्वती’ मालिकेच्या प्रमोशनसोबतच जेव्हा-जेव्हा ‘असं सासर सुरेख बाई’चंही प्रमोशन झालंय, तेव्हा आम्ही भेटलोय. ‘कलर्स मराठी’च्या फंक्शन्सना ब-याचदा आम्ही भेटतो. त्यामूळे अगोदरच ओळख आणि मैत्रीही झाली होती. मला आजही आठवतंय, ‘सरस्वती’ मालिकेचं सर्वात पहिलं प्रमोशन पुण्यात झालं होतं. तेव्हा मी खूप घाबरले होते. पण त्यावेळी मृणाल माझ्यासोबत होती. आणि तिने मला प्रेक्षकांशी संवाद साधण्याचा क़न्फिडन्स दिला होता. त्यामुळे आमची विशेष बॉन्डिंग आहेच.”
ती पूढे सांगते,“खरं तर, ज्या सेलेब्रिटींना मी नेहमी टिव्हीवर पाहत आलीय, त्या सेलेब्सशी बोलताना मला नेहमीच अवघ़डल्यासारखं होतं. पण मृणाल कदाचित एकुलती एक एक्टरेस असावी, जिच्याशी बोलताना मला दडपण येत नाही. मी खूप मनमोकळेपणाने बोलते. आम्ही जेव्हा केव्हा भेटतो, तेव्हा आम्ही आमच्या कामाविषयी कधीच बोलत नाही. आम्ही इतर गप्पाच खूप मारतो.”
मृणाल दुसानिस सांगते,“तितीक्षाशी माझी चांगली गट्टी ह्यासाठी जमलीय, कारण ती ग्लॅमर घेऊन वावरत नाही. ती साधी आणि खूप ‘डाऊन टू अर्थ’ मुलगी आहे, अजीबात उथळ नाहीये. त्यामुळेच कदाचित आमची मैत्री खूप पटकन झाली.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मृणाल दुसानिस आणि तितीक्षा तावडेची बॉन्डिंग
(फोटो -स्वप्निल चव्हाण)
बातम्या आणखी आहेत...