आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिझनेसमनसोबत मृण्मयी अडकली लग्नाच्या बेडीत, बघा Wedding Album

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे बिझनेसमन स्वप्नील रावसोबत 3 डिसेंबर रोजी लग्नाच्या बेडीत अडकली. मृण्मयीच्या लग्नाला मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली होती. 'कट्यार काळजात घुसली' या सिनेमातून अभिनेता म्हणून पदार्पण केलेले पार्श्वगायक शंकर महादेवन यांनी खास उपस्थिती लावली होती. भार्गवी चिरमुले, अमृता खानविलकर, पूजा सावंत, पुष्कर श्रोत्रीसह अनेक सेलिब्रिटींनी मृण्मयी आणि स्वप्नीलला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

मृण्मयी आणि स्वप्नीलचे हे अरेंज मॅरेज आहे. स्वप्नील एक बिझनेसमन आहे. लग्नापूर्वी मृण्मयीच्या मेंदी, संगीत सेरेमनीचे फोटोज समोर आले होते. या छायाचित्रांमध्ये मृण्मयी स्वप्नीलसोबत ठुमके लावताना दिसली होती. संगीत सेरेमनीत अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि त्याची पत्नी सुखदा खांडकेकर यांनी हजेरी लावली होती. अभिजीतने संगीत सेरेमनीचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात मृण्मयी आणि स्वप्नीलसोबत त्यांच्या कुटुंबीयांनीही ताल धरला होता.

मृण्मयीने मोठ्या पडद्यासोबतच छोट्या पडद्यावर अभिनयाची छाप सोडली आहे. अग्निहोत्र, कुंकू या तिच्या गाजलेल्या मालिका आहेत. तर कट्यार काळजात घुसली आणि नटसम्राट या सिनेमांतही तिने लक्षवेधी भूमिका साकारली आहे. हनीमूनसाठी मृण्मयी आणि स्वप्नील यांनी न्यूझीलंडची निवड केली आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, मृण्मयी-स्वप्नीलच्या लग्न, संगीत, मेंदीचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...